Homeमहाराष्ट्रमाजी सरन्यायाधीश भूषण गवई सहकुटुंब

माजी सरन्यायाधीश भूषण गवई सहकुटुंब

नागपूर : प्रतिनिधी
धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ज्यांना ‘बागेश्वर बाबा’ म्हणून ओळखले जाते, हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि सोशल मीडियावरही त्यांची मोठी लोकप्रियता आहे. तथापि, त्यांच्या चमत्कारांच्या दाव्यांवरून वादही निर्माण झाले असून अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर चर्चा रंगताना दिसते.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अलीकडेच मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या कुटुंबासह त्यांनी येथे दर्शन घेतले असून, धामाचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याशी संवाद साधला. यावेळी गवई यांनी बागेश्वर धाममार्फत चालविल्या जाणा-या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले आणि श्रद्धा व समाजसेवा यांचा संबंध अधोरेखित केला. या भेटीमुळे बागेश्वर धाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या पत्नी तेजस्विनी गवई आणि पुत्र ज्योतिरादित्य गवई यांच्यासह मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे भेट दिली. याबाबत स्वत: बागेश्वर धाम यांच्या एक्स अकाऊंटवरून माहिती देण्यात आली. त्यांनी कुटुंबासह बागेश्वर बालाजीचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली.

दर्शनानंतर गवई कुटुंबीयांनी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी बागेश्वर सरकार यांनी त्यांना बालाजी भगवानांचे पवित्र चित्र भेटस्वरूप दिले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या विशेष भेटीत आध्यात्मिक विषयांवर चर्चा करण्यात आली.

याशिवाय, बागेश्वर धाममध्ये चालविण्यात येणा-या गुरुकुल तसेच विविध सामाजिक व धार्मिक प्रकल्पांबाबतही सविस्तर संवाद झाला. गवई यांचा हा बागेश्वर धामचा पहिलाच दौरा नसून, यापूर्वीही आपल्या कार्यकाळात त्यांनी येथे अनेकदा दर्शनासाठी भेट दिली होती. यावरून त्यांच्या या स्थळावरील दृढ श्रद्धेची प्रचिती येते.

नागपूरमध्ये झाला होता वाद
गवई यांचा हा बागेश्वर धामचा पहिलाच दौरा नसून, यापूर्वीही आपल्या कार्यकाळात त्यांनी येथे अनेकदा दर्शनासाठी भेट दिली होती. यावरून त्यांच्या या स्थळावरील दृढ श्रद्धेची प्रचिती येते. मात्र, नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर तर्कवादी कार्यकर्त्यांनी या दाव्यांवर तीव्र आक्षेप घेतला. समितीने शास्त्री यांना उघड आव्हान देत, त्यांच्या चमत्कारिक दाव्यांची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी करण्याची मागणी केली आणि अंधश्रद्धाविरोधी कायद्याअंतर्गत कारवाईची शक्यता व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR