मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. आता या दोघांची जोडी पुन्हा एकदा कॅमे-यासमोर आली आहे.
माधुरी दीक्षितचा ‘माँ बहन’ हा सिनेमा नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाचे नुकतेच स्क्रीनिंग झाले. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अनिल कपूरदेखील हजर होते.
यावेळी दोघांनी एकत्र फोटो काढले. सध्या त्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडीओमध्ये पाहायला मिळते की अनिल कपूर यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर माधुरीने पिवळ्या व निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यांनी एकत्र फोटोंसाठी पोझ दिल्या. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांनी देखील पुन्हा दोघांना चित्रपटात एकत्र पाहण्यास आनंद होईल असे कमेंट करत म्हटले आहे.
माधुरी व अनिल कपूर यांनी पहिल्यांदा ‘तेजाब’ या सिनेमात एकत्र काम केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर दोघांनी लज्जा, परिंदा, हिफाजत, प्रतिकार, राम लखन, टोटल धमाल, दिल तेरा आशिक, बेटा, किशन कन्हैय्या, खेल,जमाई राजा, राजकुमार, जिंदगी एक जुवा, अशा अनेक सिनेमांत एकत्र काम केले.
















