रवींद्र धंगेकरांना अटक होणार?

पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या मृत्यूप्रकरणात माजी आमदार तथा शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात त्यांच्यासह पत्नी प्रतिभा धंगेकर आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेची शक्यता निर्माण झाल्याने दोघेही सध्या संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली आहेत.

खलील शेख यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर आणि अन्य व्यक्तींवर करण्यात आला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर कारवाईची शक्यता वाढली आहे. अटक टाळण्यासाठी धंगेकर दाम्पत्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, पोलिस कारवाईपूर्वी दोघांनीही आपले मोबाईल फोन बंद ठेवले असून ते नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. अटकपूर्व जामिनावर निर्णय होण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी त्यांनी अज्ञातस्थळी मुक्काम केल्याची माहिती समोर येत आहे.

मृत्यूपूर्वी खलील शेख यांनी एक व्हीडीओ रेकॉर्ड करून आपल्या मृत्यूस कोण जबाबदार आहे याचा उल्लेख केला होता. या व्हीडीओमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे तसेच इतर काही व्यक्तींची नावे घेतली होती. त्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात धंगेकर यांच्यासह एकूण ४ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला.

खलील शेख यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, व्यवसायातील इतर भागीदार केवळ नावापुरते होते, तर आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण रवींद्र धंगेकर यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तपासादरम्यान प्रत्येक व्यक्तीचा सहभाग, आर्थिक देवाणघेवाण आणि थकित व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच धंगेकर हे स्वत:च्या पैशांच्या वसुलीसाठी एका विशिष्ट व्यक्तीकडे वारंवार जात असल्याची माहितीही समोर आली आहे. मृताने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सुमारे अडीच कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याचा उल्लेख असल्याने या आर्थिक व्यवहारांचाही तपास केला जाणार असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news