Homeराष्ट्रीयरुपयाची घसरण सुरूच, ९६ चा टप्पा ओलांडला

रुपयाची घसरण सुरूच, ९६ चा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : भारताच्या रुपया चेन्च्युरी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. क्रूडच्या वाढत्या किंमती, डॉलरची मजबुती आणि पश्चिम आशियातील तणाव अजूनही कायम असून, अशा घटकांच्या दबावामुळे भारतीय रुपयाने शुक्रवारी इतिहासात पहिल्यांदाच ९६ चा टप्पा ओलांडला. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी दिवसभरात ५० पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९६.१४ ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली.

गेल्या सलग तीन सत्रात रुपया कमकुवत झाला असून या आठवड्यात आतापर्यंत सुमारे १.३६ टक्के घसरण झाली. परिणामी रुपयाने पुन्हा एकदा विक्रमी नीचांकी पातळी गाठली. जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमधील तीव्र वाढीमुळे गेल्या काही महिन्यांत रुपयावरील दबाव अधिकच वाढला. ब्रेंट क्रूडच्या एका बॅरलचा भाव १०७ डॉलरजवळ राहिला असून जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता आणि भू-राजकीय तणाव यामुळेच भारतीय चालनावरील दबाव सतत वाढत आहे. त्यामुळे सातत्याने घसरण सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR