लातूर : प्रतिनिधी
हिंदू -हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान लातूर विभागाने एकुण ५ पारितोषीके पटकावली आहेत. संपूर्ण राज्यभरात लातूर विभागाने हिंदू -हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात उत्तम काम करुन लातूरच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
राज्य परिवहन महामंडळात प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानके उपलब्ध व्हावीत या हेतुने सन २०२५ पासून राज्य परिवहन महामंडळातील सर्व बसस्थानकांवर हिंदू -हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभर राबविण्यात आले. दि. २३ मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत चौथे सर्वेक्षण पुर्ण झाले असून त्याचा निकाल दि. २९ मे रोजी प्रसिद्ध झाला आहे.
या अभियानात औसा बसस्थानक: ‘अ’ वर्ग बसस्थानकामध्ये छत्रपती संभाजीनगर प्रदेशात पहिला, १० लाख रुपये बक्षीस, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. मुरुड बसस्थानक: ‘अ’ वग बसस्थानकामध्ये छत्रपती संभाजीनगर प्रदेशात दुसरा, ५ लाख रुपये बक्षीस, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. लातूर रेणापूर नाका बसस्थानक क्रमांक-३: ‘ब’ वर्ग बसस्थानकामध्ये छत्रपती संभाजीनगर प्रदेशात दुसरा, २.५ लाख रुपये बक्षीस, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह. लामजना बसस्थानक: ‘क’ वर्ग बसस्थानकामध्ये छत्रपती संभाजीनगर प्रदेशात दुसरा, ५० हजार रुपये बक्षीस, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह. शिरुर अनंतपाळ: ‘क’ वर्ग बसस्थानकात छत्रपती संभाजीनगर प्रदेशात तिसरा, २५ हजार रुपये बक्षीस, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह.
लातूर विभागातील सर्व पुरस्कार प्राप्त बसस्थानकांचे आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड लातूर आगार, शंकर स्वामी औसा आगार, अनिल बिडवे निलंगा आगार यांचे दि. ३ जून रोजी लातूर विभागाचे नियंंत्रक विलास राठोड यांनी अभिनंदन केले व पुरस्कार मिळवून लातूर विभागाचे राज्यात नावलौकीक केल्याबद्दल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व सर्व प्रवाशांचे अभिनंदन केले. या प्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, प्रविण राठोड, विभागीय अभियंंता स्थापत्य जगदीश कोकाटे, विभागीय लेखाधिकारी अमित गंडाळे व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















