शिवाजी पार्कात पोलिसांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक!

मुुंबई : जंतरमंतरवर गेल्या अनेक दिवसापासून काक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरून पाठिंबा देत आहे. सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात रविवारी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनासाठी परवानगी नसल्याने पोलीस व ठाकरे यांच्या शिवसैनिकात वाद झाला.

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असलेल्या काक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी शिवसैनिक व पोलिसात परवानगी नसल्याने व स्टेज वाढविण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असलेल्या काक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २० जुलैला दिल्लीला जाणार होते. मात्र, त्याठिकाणच्या आंदोलनात व्यत्यय निर्माण केला जात आहे. सोनम वांगचुकांना उपोषणस्थळावरून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क येथे रविवारी आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसल्याने शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली असतानाच याठिकाणी पोलिसांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. या ठिकाणचा स्टेज वाढवण्यावरून यावेळी पोलिस-शिवसैनिकांत हायव्होल्टेज ड्रामा पहावयास मिळाला. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना शांत केले.

दरम्यान, सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात रविवारी ठाकरे यांचा पक्ष रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यासोबतच स्टेजवरूनही पोलीस व शिवसैनिकाच्या वाद झाला. याठिकाणी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news