जळगाव : प्रतिनिधी
अमेरिका-इजरायल आणि इराण यांच्या मधील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रूपयांची किंमत घसरत चालली आहे. असे असताना सोन्याचे दर वाढतील असा अंदाज वर्तवला जात होता. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याच पाहायला मिळाले. जळगावातील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा १५०० रूपयांच्या आसपास घसरण नोंदवण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज ९ मार्च रोजीआठवड्याच्या पहिल्याच दिवशी खरेदीदारांना मोठा फायदा झाला आहे. अमेरिका इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. पण आठवड्यात सोन्याच्या दराला पुन्हा एकदा उतरती कळा लागल्याचे दिसतेय. शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर १,६१००० वरून १,५९ , ५०० रूपयांवर आले आहे.
मागील दोन दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात पंधराशे रूपयांची घसरण झाली आहे. जीएसटीशिवाय सोन्याचे दर १६१००० वरून १५९५०० वर खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात ही दोन दिवसात दोन हजार रूपयांची घसरण होऊन चांदीचे दर जीएसटी २६८००० हजार रूपयांवरून २६६००० वर खाली आले आहेत.

