पान टपरी बसविताना विजेचा धक्का लागून ३ ठार

परभणी : परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पान टपरी बसवताना ६ जणांना विजेचा धक्का लागला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन अत्यवस्थ आहेत. परभणीच्या पालममधील बालाजी नगर इथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

परभणीच्या पालममधील बालाजी नगर येथील शेख शफीक शेख मुसा यांची पान टपरी होती. त्यांनी ती बैलगाडीतून घरी आणल्यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा टपरी घसरुन बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. यात काम करणारे सिद्धार्थ नरहरी बावळे, शेख शफीक शेख मुसा व शेख शौकत शेख मुसा या तीन जणांना विजेचा तीव्र धक्का बसला.

या तिघांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या अपघातात शेख फरहान शेख महेबूब, शाकेर शेख व शेख असलम शेख गुड्डू हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या साई हॉस्पिटल, लोहा येथे उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पालम शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news