Homeराष्ट्रीयशिक्षणात ‘एआय’ अभ्यासासाठी ‘यूपीआय’सारखे व्यासपीठ

शिक्षणात ‘एआय’ अभ्यासासाठी ‘यूपीआय’सारखे व्यासपीठ

मोबाइलवर कोणत्याही वर्गाचे व्याख्यान बघता येणार शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन होणार

नवी दिल्ली : एआयमुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. अभ्यासासाठी यूपीआयसारखे राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले जात आहे. यामुळे शाळा-महाविद्यालयीन कोणत्याही विषयाचा कोणताही टॉपिक मोबाइलवर ऑडिओ आणि व्हीडीओमध्ये उपलब्ध होईल. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या भाषेत आणि शिक्षकांच्या आवाजात व्याख्याने ऐकू शकतील. हे प्लॅटफॉर्म ‘भारत बोधन एआय स्टॅक’ या नावाने विकसित केले जात आहे.

ज्याप्रमाणे भीम, गुगलपे, पेटीएम आणि फोनपे यांसारखे अ‍ॅप्स यूपीआयवर काम करतात, त्याचप्रमाणे शिक्षणाशी संबंधित मोबाइल अ‍ॅप्स ‘भारत बोधन’ एआय स्टॅकवर काम करतील. हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे कस्टमाइज्ड असेल. विद्यार्थी जसा प्रश्न विचारेल, त्यानुसार लेक्चर तयार होईल. विद्यार्थी ऑडिओ किंवा व्हीडीओचा पर्याय निवडू शकतील. भाषा बदलली तरी शिक्षकाचा टोन आणि शिकवण्याची पद्धत तीच राहील. हे इंटरअ‍ॅक्टिव्ह असेल, ज्यामुळे विद्यार्थी प्रश्न विचारून त्वरित उत्तरे मिळवू शकतील. वर्गखोलीपासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत व्यासपीठ मदत करेल हे व्यासपीठ विद्यापीठाच्या स्तरावरील शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी, लॅब टेस्टचा थ्री-डी अनुभव आणि रिसर्च स्कॉलर्सच्या संशोधनातही मदत करेल. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आवाजात आणि टोनमध्ये, एआयच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय भाषण हिंदी आणि कन्नडमध्ये प्रसारित करण्यात आले होते. याच तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात केला जाईल.

‘बोधन एआय’ ची औपचारिक सुरुवात
शिक्षणात एआयच्या संस्थात्मक वापराला प्रोत्साहन देण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये ‘बोधन एआय’ उपक्रमाची औपचारिक सुरुवात केली जाईल. या प्रसंगी ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह’मध्ये निवडक एआय सोल्यूशन्सचे प्रदर्शनही केले जाईल. भारत बोधन एआय स्टॅक अंतर्गत शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास, एआय संशोधन आणि डीप टेक्नॉलॉजीशी संबंधित प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. हे सर्व राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याशी सुसंगत असतील. हे प्लॅटफॉर्म टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केले जाईल.

सेंटर फॉर एक्सलन्सची स्थापना
शिक्षण मंत्रालयाने आयआयटी मद्रासमध्ये शिक्षणातील एआयसाठी सेंटर फॉर एक्सलन्सची स्थापना केली आहे. याला ‘आयआयटी मद्रास बोधन एआय फाउंडेशन’ असे नाव देण्यात आले आहे. या केंद्राला भारत बोधन एआय स्टॅक अंतर्गत स्केलेबल एआय सोल्युशन्स विकसित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांनुसार, जर १२ वीचा कोणताही विद्यार्थी ऑप्टिक्स (प्रकाशशास्त्र) शिकू इच्छित असेल तर तो प्लॅटफॉर्मवर विषय निवडू शकेल. एनसीईआरटी आणि राज्य मंडळांच्या पाठ्यपुस्तकांना एआय रिपॉझिटरीचा भाग बनवले जाईल. हे दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR