Homeलातूरखेळातून राष्ट्रीय एकतेची कल्पना प्रत्यक्षात येवून देशप्रेमाची भावना जोपासली जाते 

खेळातून राष्ट्रीय एकतेची कल्पना प्रत्यक्षात येवून देशप्रेमाची भावना जोपासली जाते 

लातूर : प्रतिनिधी
खेळाडूंनी कायमच पंचाच्या निर्णयांच्या आदर करावा तसेच खेळातून राष्ट्रीय एकतेची कल्पना प्रत्यक्षात येवून देशप्रेमाची भावना जोपासली जाते. खेळामुळे संघ भावना विकसित होते तर हार, जीत हा कुठल्याही खेळाचा अविभाज्य भाग असून हार व जीत झाली तरी परस्परांबद्दल नेहमी आदरभाव ठेवून विद्यार्थ्यांनी खिलाडुवृत्ती जोपासावी, असे प्रतिपादन कृषि महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
कृषि महाविद्यालय, लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कला व क्रिडा गुणांना वाव मिळावा या हेतूने क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हॉलीबॉल स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बडगीर तर प्रमुख अथिती म्हणून शिवाजी गिरी, कुणाल गुंगार्डे, डॉ. व्यंकट जगताप, जिमखाना उपाध्यक्षा डॉ. ज्योती देशमुख, डॉ. विजय भामरे, डॉ. राजेश शेळके हे उपस्थित होते.  यावेळी बडगीर म्हणाले की, विद्यार्थीनींनी खेळ हे जिंकण्यासाठी नव्हे, तर सहभागासाठी सुद्धा खेळले पाहिजेत. त्यातूनच तुमचा संपूर्ण विकास होवून उद्याचे सशक्त व तंदुरुस्त नागरिक तयार होवू शकतात. यावेळी घुंगार्डे यांनी खेळाडूंना जीवनात अभ्यासाबरोबर खेळास प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
तसेच या क्रिडा सप्ताह अंतर्गत क्रिकेटच्या स्पर्धा दि. ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान रोजी पार पडल्या. यात मुलांमध्ये चौथ्या वर्षाच्या व मुलींमध्ये तिस-या वर्षाच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद मिळविले तर प्रथम वर्ष पदव्युत्तरचे विद्यार्थी व चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनींचा संघ उपविजेता ठरला. रस्सीखेच स्पर्धेमध्ये मुलांमध्ये तिस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद व पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उपविजेते पद मिळविले. विद्यार्थिनींमध्ये चौथ्या वर्षाचे विद्यार्थ्यांनी विजेतेपद तर तिस-या वर्षाच्या विद्यार्थिनींनी उपविजेतेपद संपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. राजेश शेळके यांनी केले. यावेळी  डॉ. अनंत शिंदे, डॉ. दयानंद मोरे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. सचिन पडवळ, नामदेव खटिंग यांनी सहकार्य केले. विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीने क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन पार पडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR