Homeनांदेडभीषण आगीत ४ फर्निचर दुकाने जळून खाक; कोट्यावधींचा माल भस्मसात

भीषण आगीत ४ फर्निचर दुकाने जळून खाक; कोट्यावधींचा माल भस्मसात

भोकर : प्रतिनिधी
शहराबाहेरील भागात मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत ४ फर्निचर दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. यात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास १ दुकानातून अचानक आग लागली. अवघ्या काही वेळातच तिरूमला व साईकृपा फर्निचर या नावाने ओळखली जाणारी चारही दुकानांसह संपूर्ण शेड आगीत भस्मसात झाले.

या  आगीत सागवान लाकडापासून तयार केलेले महागडे पलंग, कपाटे, फर्निचरचे विविध साहित्य, मोठा टीव्ही, शाईन कंपनीची टू-व्हीलर, तसेच लाकडी कोरीव काम (कारविंग) करणारी कोट्यवधी रुपयांची महागडी यंत्रसामग्री जळून खाक झाली. विशेष म्हणजे, लाकडी पॉलिश व कारविंगसाठी वापरण्यात येणारी ४ ते ५ मोठी मशीन देखील पूर्णत: नष्ट झाली आहेत. या घटनेमुळे काका, पुतणे असलेल्या राचुटकर परिवार संकटात सापडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR