लातूरमध्ये सलग दुस-या दिवशी अपघात; २ दिवसांत ६ ठार

लातूर : प्रतिनिधी
लातूर-नांदेड महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. लातूरमधील बुधोडापाटीजवळ मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-तुळजापूर महामार्गावरच्या बुधोडापाटी येथे कार आणि जीपचा मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहत. लातूरच्या दिशेने येणा-या जीप गाडीला भरधाव वेगात येणा-या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात मृत्यू पावलेली ही व्यक्ती धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने अपघातात मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तर जखमींवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अपघातानंतर महामार्गावर झालेली वाहतूक सुरळीत केली.

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात
तत्पूर्वी, लातूर-नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटीजवळ शनिवारी भीषण अपघाताची घटना घडली. कंटेनर, कार आणि दुचाकी या तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघात दुचाकीवर प्रवास करणारे पती-पत्नी आणि कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झालेत.

जनार्दन येणगे आणि सविता येणगे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत जाली होती. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News|स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावर? प्रशासकीय इमारतीची दयनीय अवस्था
02:56
Video thumbnail
Latur News|रविवारीही मनपा खुली; विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रशासन धावले
03:36
Video thumbnail
Latur Accident|लातूर जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच; बुधोडा जवळ भीषण धडक, 3 ठार 17 जखमी
01:14
Video thumbnail
Nilesh Lanke On Election|"राजकारणात काहीही होऊ शकतं!" — निलेश लंकेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
00:44
Video thumbnail
Latur Accident News|अलगरवाडीजवळ मृत्यूचा थरार; तिहेरी अपघातात तिघांचा बळी!
00:29
Video thumbnail
Latur|गॅस महाग, लाकूड महाग;हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले!
02:17
Video thumbnail
Latur Accident|खंबाळवाडीजवळ भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले प्राण
01:01
Video thumbnail
Ambadas Danve On Devendra Fadnavis|मुख्यमंत्र्यांनी दिलेला बैल आजारीच!" दानवेंचा गंभीर आरोप
04:52
Video thumbnail
Latur|ठाकरे गटाच्या बैठकीतच राडा; व्यासपीठावर शिवसैनिक भिडले!
00:53
Video thumbnail
'भारत भाग्य विधाता' चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला कंगना रणौतची ग्लॅमरस हजेरी!
00:42
Video thumbnail
जेव्हा सचिन तेंडुलकर विमानातच क्रिकेट खेळू लागला...!
00:42
Video thumbnail
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण: अंबाबाई मंदिराच्या शिखरावर झळकणार अडीच कोटींचा सुवर्णकळस
00:43
Video thumbnail
Latur Accident|निटूरमध्ये भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
01:12
Video thumbnail
Latur Farmar News|पत्नीसोबत स्वतः नांगर ओढणाऱ्या शेतकऱ्याला अखेर मिळाला बैल!
01:38
Video thumbnail
Latur -बसस्थानकात सोनसाखळी चोरणारी महिला काही तासांत जेरबंद! #marathilivenews #Latur #police
00:41

Latest news