विलास साखर कारखान्याकडून प्रती मे. टन ३१७१ रुपये उच्चांकी दर जाहीर

वैशालीनगर : प्रतिनिधी
मांजरा परिवारातील अग्रणी असलेल्या विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी (ता. लातूर) या कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा देणारा निर्णय घेत प्रति मे. टन ३१७१ रुपये  , असा अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. तसेच अंतिम हप्त्यायापोटी ३२१ रुपये प्रति मे.टनाप्रमाणे ऊस बिल शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार वैजनाथराव शिंदे आणि कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
गाळप झालेल्या ऊसाला कारखान्याने यापूर्वीच प्रति मे. टन २८५० रुपये प्रमाणे बील अदा केले असून, सध्या खरीप पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे मशागत, पेरणी, बियाणे, खते आदींसाठी शेतक-यांना पैशाची गरज भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेत कारखान्याने उच्चांकी  ऊस दर जाहीर करुन अंतिम  हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांच्या हिताचा विचार करून प्रति मे. टन ३१७१ रुपये प्रमाणे उच्चांकी ऊस दर अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने ६,५१,४३१.२३६ मे.टन उसाचे गाळप केले. यात १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला असून, ७,१४,४७० क्विंल साखर उत्पादन झाले आहे. तसेच कारखान्याने ४ कोटी ७८ लाख ८० हजार ६०० युनिट वीज निर्मिती करून यातील २ कोटी ८२ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. डिस्टीलरी प्रकल्पातून १ कोटी ०१ लाख लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरवर पोलिसांचे राज्य की कोयता गँगचे?;भरदिवसा महिला आणि चिमुकल्यावर हल्ला
01:50
Video thumbnail
Latur|NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचे मॉक ड्रिल
02:15
Video thumbnail
BIG BREAKING : यशवाडी मारुती मंदिरात सभागृहाचा भाग कोसळला;40 ते 50 भाविक जखमी
01:18
Video thumbnail
Latur|14,500 विद्यार्थ्यांचे स्वप्न पणाला; उद्या NEET ची महासंग्राम परीक्षा!
02:27
Video thumbnail
Latur|NEET घोटाळ्यावर लातूर पेटलं! गांधी चौकात धरणे आंदोलन
06:21
Video thumbnail
Latur|औसा नगरपरिषदेवर अफसर शेख पुन्हा विराजमान
04:48
Video thumbnail
Nanded|पिस्तूल असती तर गोळ्या घातल्या असत्या!" ठाकरे गटाच्या नेत्याचा संताप
02:46
Video thumbnail
Ashok Chavan On Udhav Thakre|उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं!–अशोक चव्हाणांचा थेट टोला
02:30
Video thumbnail
Pandharpur|गोपाळपूरमध्ये गुटख्याचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत?
00:57
Video thumbnail
Latur|एल निनोचा प्रभाव; लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
00:34
Video thumbnail
NEET UG 2026| लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर;जिल्हाधिकारी स्वतः मैदानात
03:18
Video thumbnail
युक्रेनचा रशियावर मोठा प्रतिहल्ला; मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला
00:27
Video thumbnail
भंडारदऱ्यात निसर्गाची जादू! लाखो काजव्यांच्या प्रकाशाने उजळले गर्द जंगल
00:27
Video thumbnail
अक्षय कुमारने घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन; जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे लावली हजेरी
01:09
Video thumbnail
Latur|फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
03:47

Latest news