अण्णांचा आंदोलनाचा इशारा

माहिती अधिकार कायद्यातील बदलाला विरोध
अहिल्यानगर : प्रतिनिधी
देशात आणि महाराष्ट्रात माहिती अधिकार (फळक) कायदा अस्तित्वात येण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कायद्यातील बदलांवर नाराजी दर्शवली आहे. राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलावर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला असून आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे.

शासनाने १२ जून रोजी माहिती अधिकार कायदा २००५ संदर्भात सुधारित अधिसूचना जारी केली आहे. मात्र, त्यास सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. माहिती अधिकार कायदा वापरताना पूर्वीच्या नियमात बदल केल्याने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला. माहिती अधिकार कायदा केल्यानंतर प्रथमच या कायद्याच्या अंमलबजावणीत बदल करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार आतापर्यंत माहिती अधिकार कायद्याचा वापर करून माहिती मागवताना होणारा १० रुपयाचा खर्च आता ३० रुपये केला आहे. यासोबतच प्रथम अपील ५० रुपये तर दुस-या अपिलासाठी शंभर रुपये शासनाकडे जमा करावे लागणार आहेत.

सामान्यांना माहिती
मिळविणे अशक्य
मिळालेल्या माहितीसाठी प्रतिपान २ रुपयावरून प्रतिपान ५ रुपये इतके शुल्क संबंधित विभागाकडून आकारले जाणार आहे. या नियमासह एकूण १२ नियम करण्यात आले आहेत. या नियमांमुळे सामान्य नागरिकांना माहिती मिळवणे अशक्य होणार आहे. त्यामुळे अण्णांनी नाराजी व्यक्त केली.

पैसे कमविणे उद्देश नको
माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, पैसे कमावण्याचे साधन नाही. काही लोक याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे शुल्क आकारणे गरजेचे आहे. मात्र, यातून पैसे कमावणे हा उद्देश नसावा, असे अण्णांनी म्हटले. फडणवीस सरकारने केलेले बदल पुन्हा पूर्ववत केले नाही तर आपण उपोषण करणार असल्याचे अण्णा म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरवर पोलिसांचे राज्य की कोयता गँगचे?;भरदिवसा महिला आणि चिमुकल्यावर हल्ला
01:50
Video thumbnail
Latur|NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचे मॉक ड्रिल
02:15
Video thumbnail
BIG BREAKING : यशवाडी मारुती मंदिरात सभागृहाचा भाग कोसळला;40 ते 50 भाविक जखमी
01:18
Video thumbnail
Latur|14,500 विद्यार्थ्यांचे स्वप्न पणाला; उद्या NEET ची महासंग्राम परीक्षा!
02:27
Video thumbnail
Latur|NEET घोटाळ्यावर लातूर पेटलं! गांधी चौकात धरणे आंदोलन
06:21
Video thumbnail
Latur|औसा नगरपरिषदेवर अफसर शेख पुन्हा विराजमान
04:48
Video thumbnail
Nanded|पिस्तूल असती तर गोळ्या घातल्या असत्या!" ठाकरे गटाच्या नेत्याचा संताप
02:46
Video thumbnail
Ashok Chavan On Udhav Thakre|उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं!–अशोक चव्हाणांचा थेट टोला
02:30
Video thumbnail
Pandharpur|गोपाळपूरमध्ये गुटख्याचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत?
00:57
Video thumbnail
Latur|एल निनोचा प्रभाव; लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
00:34
Video thumbnail
NEET UG 2026| लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर;जिल्हाधिकारी स्वतः मैदानात
03:18
Video thumbnail
युक्रेनचा रशियावर मोठा प्रतिहल्ला; मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला
00:27
Video thumbnail
भंडारदऱ्यात निसर्गाची जादू! लाखो काजव्यांच्या प्रकाशाने उजळले गर्द जंगल
00:27
Video thumbnail
अक्षय कुमारने घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन; जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे लावली हजेरी
01:09
Video thumbnail
Latur|फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
03:47

Latest news