लातूर : प्रतिनिधी
रोटरी क्लब लातूरच्या वतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी हॉटेल एम्बसीच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा यावेळी गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी रोटरी क्लब लातूरचे अध्यक्ष रोटेरियन जकीखान कायमखानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल रविशंकर हिंगणे, रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर अॅस्पिरेशनच्या अध्यक्षा रोटेरियन कौशल्या सोनकवडे तसेच सचिव रोटेरियन वनिता लचुरिया उपस्थित होत्या.
यावेळी स्पर्श हॉस्पिटल, लातूर-व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड (आरोग्य सेवा) युनिटी क्रेडिट सोसायटी लातूर-व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड (आर्थिक विकास) प्रा. सुधाकर तोडकर, नेटिझन्स फाउंडेशन स्कूल, लातूर-व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड (साक्षरता सेवा), इरफान मुजावर- शौर्य पुरस्कार ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन-व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड (पर्यावरण सेवा), आशीष कामदार-व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड (व्यावसायिक नैतिकता), संगीता महादेव बरुरे-व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड (सामुदायिक स्वच्छता), डॉ. प्रियांका मेहुल राठोड-कर्करोग तज्ज्ञ, प्रा. पूनम नथानी-प्राध्यापिका, दयानंद विधी महाविद्यालय, लातूर या सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष रोटेरियन जकीखान कायमखानी यांनी केले. यावेळी डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात रोटरी क्लब लातूरचे सचिव रोटेरियन विश्वनाथ निगुडे तसेच व्होकेशनल सर्व्हिसेस संचालक रोटेरियन संजय जोगदंड यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
फोटो: १
















