माझे १००० मिसाईल्सच्या खटक्यावर बोट आहे; …तर इराण बेचिराख करणार

न्यूयॉर्क : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच इराणसोबतचा शांती करार रद्द झाल्याची घोषणा केली होती. आता त्यांनी इराणला बेचिराख करणार अशी धमकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरून दिली. त्यांनी दावा केला आहे की अमेरिकेची १००० मिसाईल लॉक्ट अँड लोडेड आहेत. इराणला धमकी देत त्यांनी जर इराणने त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा तसा कट रचला तर अमेरिकेचे लष्कर वर्षभर इराणच्या प्रत्येक भागात सतत हल्ला करण्यासाठी सज्ज आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जर इराण सरकारने जगाच्या कोणत्याही कोप-यात माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणच्या सर्व भागांना बेचिराख करून टाकेल. याचा आदेश आधीच देण्यात आला आहे. अमेरिकेचे सैन्य पूर्ण तयार आहे.’

ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे ज्यावेळी अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष पुन्हा शिगेला पोहोचला आहे. जूनमध्ये दोन्ही देशांनी मोठ्या संघर्षानंतर एक तात्पुरता युद्धविराम केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लष्करी कारवाईनंतर पुन्हा या भागातील वातावरण बिघडले आहे.

ट्रम्प इराणच्या हिट लिस्टवर
नुकतेच ट्रम्प यांनी नाटो बैठकीवेळी आपण इराणच्या हिट लिस्टवर आहोत असे सांगितले होते. या यादीत आपण सर्वोच्च स्थानावर आहोत. ही माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून मिळाली असल्याचे सांगण्यात आले. इराण त्यांच्याविरुद्ध कट रचत आहे असा दावा त्यांनी केला. त्यानंतर अमेरिकी लष्कराला अजून कडक लष्करी कारवाईची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इस्रायलने दिली गुप्त माहिती

ट्रम्प यांचे वक्तव्य अशावेळी आले आहे ज्यावेळी इस्रायलकडून अमेरिकेला इराणच्या कथित कटाची माहिती देण्यात आली. असे असले तरी या दाव्याची पुष्टी अजून झालेली नाही. मात्र यावरून वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात शाब्दिक चकमक वाढली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पुन्हा अतिक्रमण!कारवाईनंतर आठवड्यातच जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पुन्हा गजबजला
02:58
Video thumbnail
Latur|विठ्ठल कांगणे मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
09:34
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार; ऑफलाइन परीक्षेसाठी लातूरात महामोर्चा
01:53
Video thumbnail
Parbhani Breaking News|परभणीत खळबळ! महापौरांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न
03:05
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर हादरलं! नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या
01:36

Latest news