मुंबई, राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

शिंदे दिल्लीत, जयंत पाटील वर्षा बंगल्यावर
मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर राजधानी दिल्ली आणि मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटातील बंडखोर खासदारांना सोबत घेऊन दिल्लीत दाखल झाले असून, रात्री उशिरा ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते. दरम्यान, मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच आगामी अधिवेशनात महिला आरक्षणासोबत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नव्याने मांडले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खासदारांचे पाठबळ मिळवून बहुमताने हे विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खासदार फोडून एनडीएला बळ मिळवून देण्यासाठी नेते कामाला लागले आहेत. यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला भगदाड पाडले. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला धक्का देण्याची तयारी सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.

दरम्यान, मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदारांना घेऊन दिल्लीत दाखल झाले आणि ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गुप्तगू करणार आहेत. त्याचवेळी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. विशेष म्हणजे तत्पूर्वी जयंत पाटील आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एकत्रित बैठक झाली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचे समजते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर नेमकी काय चर्चा झाली, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.

सव्वातास चर्चा?
शरद पवार पक्षाचे जयंत पाटील आणि अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सव्वातास चर्चा केली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

शरद पवार गट एनडीएसोबत?
शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यामुळे शरद पवार गट एनडीएसोबत जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शरद पवार पक्षाचे काही आमदार आणि खासदार भाजपसोबत जायला उत्सुक असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news