राज्यातील ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारीच राहणार प्रशासक

मुंबई/कोल्हापूर : राज्यभरातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींची मुदत संपली असून तत्कालीन सरपंचांची प्रशासक म्हणून केलेल्या नियुक्तीची मुदतही संपली असल्याने आता ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारीच प्रशासक म्हणून राहणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ पर्यंत ४३३ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश होता. या ठिकाणी सुरुवातीला विस्तार अधिका-यांची आणि त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार तत्कालीन सरपंचांची प्रशासक व सदस्यांची प्रशासक मंडळ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींवर बाराही तालुक्यांतील विस्तार अधिका-यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी घेतलेल्या निर्णयावर ग्रामविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. हाच निर्णय राज्यभर लागू करण्यात आला असून याबाबतची अधिसूचना नुकतीच राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, या नियुक्तीच्या आदेशातील दिलेली सहा महिन्यांची मुदत २२ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार नेमका कोणी पाहायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते.

शासनाकडून मार्गदर्शन न मिळाल्याने कोल्हापूर पॅटर्न
शासनाकडून मार्गदर्शन न आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी त्यांच्या अधिकारात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांच्याशी चर्चा करून बाराही पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असणा-या पंचायत, शिक्षण, आरोग्य आणि कृषी विभागाच्या विस्तार अधिका-यांकडे ४३३ ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदाचा कार्यभार दिला होता. हाच निर्णय राज्यभरासाठी लागू झाला.

सहा महिन्यांची मुदत
सहा महिन्यांसाठी विस्तार अधिकारी हे प्रशासक म्हणून राहणार असून त्याआधी जर ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या तर त्यांचे प्रशासकपद संपुष्टात येणार आहे असे अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31
Video thumbnail
Nanded|मनोज जरांगे यांच्याबद्दल कॉमेंट करणाऱ्या नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस
00:46
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26

Latest news