आखातात पुन्हा युद्ध भडकले

तेहरान : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा ठिणगी पडली असून मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. मंगळवारी अमेरिकन सैन्याने इराणशी संबंधित पाच तेल टँकर्सवर हल्ला केला. त्यानंतर काही तासांतच इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळाच्या दिशेने २० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याने मध्यपूर्वेतील टेन्शन पुन्हा वाढले आहे.

अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य केल्याचे सांगत अमेरिकन सैन्याने इराणच्या तेल टँकर्सवर हल्ला केला. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये १० जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला. यामध्ये अमेरिकेच्या दोन जहाजांचा आणि आठ तेल टँकर्सचा समावेश होता. ही जहाजे प्रतिबंधित क्षेत्रातून जात होती, असे सांगत इराणने हल्ल्याचे समर्थन केले.

अमेरिकन जहाजे रडारवर
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने कुवेत आणि बहरीनच्या बंदरांजवळ असलेल्या अमेरिकन तेल टँकर्सकडे मोर्चा वळवला आहे. जहाजे बंदरात असोत किंवा समुद्रात, त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचे पाण्याखालील ड्रोन ताब्यात घेतल्याचा दावाही इराणने केला.

इराणच्या खार्ग बेटावर हल्ला
अमेरिकेच्या सैन्याने ओमानच्या आखातात ४ तेल टँकर्सना लक्ष्य केले, तर एका टँकरवर इराणच्या खार्ग बेटाजवळ हल्ला करण्यात आला. खार्ग बेट हे इराणचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र आहे. ज्या पाच टँकर्सवर हल्ला करण्यात आला, ते अब्जावधी डॉलर्सच्या एका गुप्त नेटवर्कचा भाग होते. हे नेटवर्क इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि त्याच्या प्रादेशिक मित्रपक्षांसाठी निधी गोळा करते.

इराणने डिवचले
तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्युनिशियातील इराणच्या दूतावासाने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मीम शेअर करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिमटा काढला. इराणने अमेरिकेचे पाण्याखालील ड्रोन ताब्यात घेतल्याचा दावा केल्यानंतर दूतावासाने हा मीम शेअर केला. दूतावासाने लिहिले पाण्याखाली एक ड्रोन हरवले. तेलाच्या किमती १०० डॉलरच्या जवळ पोहोचल्या आहेत. निवडणुका जवळ आल्या आहेत. कसे चाललेय ट्रम्प?

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31
Video thumbnail
Nanded|मनोज जरांगे यांच्याबद्दल कॉमेंट करणाऱ्या नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस
00:46
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26

Latest news