नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात १४ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १५.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी सर्वाधिक हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे ९७.५० तर उमरी तालुक्यातील उमरी येथे ६५.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल नायगाव खु. तालुक्यात ४२.२० मि.मी.आणि मुखेड व कंधार येथे प्रत्येकी ३२.६० मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्याची १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८९१.३० मि.मी. आहे. त्यापैकी १ जून ते आजपर्यंत सरासरी ७२५.१० मि.मी. पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात जिल्ह्यात ५४५.१० मि.मी. पाऊस झाला आहे. आजच्या पावसाची सरासरी १५.२० मि.मी. धरता चालू वर्षातील एकूण सरासरी पर्जन्यमान ५६०.३० मि.मी. झाले आहे. हे आजच्या तारखेपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या ७७.२७ टक्के, तर संपूर्ण हंगामी वार्षिक सरासरीच्या ६२.८६ टक्के आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे ९७.५० तर उमरी तालुक्यातील उमरी येथे ६५.२५ मिलिमीटर सर्वाधिक पाऊस झाला आहे. नायगाव खु. तालुक्यात ४२.२० मि.मी. पाऊस झाला. त्याखालोखाल मुखेड ३२.६०, कंधार ३२.६०, भोकर १५.८०, धर्माबाद १३.७०, मुदखेड १०.४०, किनवट ८.००, लोहा ७.००, माहूर ६.७०, नांदेड ४.५०, देगलूर ३.६०, अर्धापूर ३.३०, हदगाव ३.०० पावसाची नोंद झाली आहे.पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना काही भागांत दिलासा मिळाला
















