मुंबईत ठाकरे सेना-मनसे पोलिसांत झटापट

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज आंदोलनाची हाक दिली होती. य आंदोलनामुळे शिवाजी पार्क परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या आंदोलकांसह शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे वातावरण तापले. या संपूर्ण घडामोडींदरम्यान आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे हे बंधू रस्त्यावर उतरले. त्याचवेळी शिवसैनिक, मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे शिवसेना भवनासमोर पोलिस-शिवसैनिकांत झटापट झाली. त्यावरून चांगलाच राडा झाला.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला. यादरम्यान पोलिसांनी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केला. पोलिसांनी या आंदोलनातील अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या शिवसैनिक, मनसैनिकांना तात्काळ सोडविण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे स्वत: रस्त्यावर उतरले. दोन्ही नेत्यांनी आक्रमक होत पोलिसांच्या गाड्या अडवून धरल्या. जोपर्यंत आमच्या शिवसैनिकांना सोडले जात नाही, तोपर्यंत पोलिसांची गाडी इथून हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली.

दुसरीकडे शिवाजी पार्क परिसरात आलेल्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असल्याने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही रस्त्यावर उथरले. पोलिसांनी मनसेच्या पदाधिका-यांचीही धरपकड करण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडी अडवून धरत विरोध दर्शविला. मनसे कार्यकर्त्यांची वाढती गर्दी पाहून पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवला आणि आंदोलकांना घेऊन जाणा-या गाड्या तेथून बाजूला केल्या.

आदित्य ठाकरे, अमित ठाकरे पोलिस ठाण्यात
पोलिसांनी ज्या आंदोलकांची धरपकड केली, त्यांना सोडविण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

शिवसैनिक, मनसैनिक मुंबईत रस्त्यावर उतरेल
आदित्य ठाकरे यांनी पोलिस प्रशासनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आम्ही अनेकदा मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे. पण ते थेट दिल्ली पोलिसांसारखे वागू लागले आहेत. असेच प्रकार सुरू राहिले तर मुंबईच्या प्रत्येक कानाकोप-यात शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news