17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी ‘फिफ्टी-फिफ्टी’

सोलापूर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी ‘फिफ्टी-फिफ्टी’

सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार तर शिवसेना(उबाठा), शेकापचा प्रत्येकी एक आमदार

सोलापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात मतदारांनी महायुती व महाविकास आघाडी यांना समसमान विजयाच दान दिले. पाच ठिकाणी भाजप, चार ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार विजयी झाले. शिवसेना (उबाठा)ला एक व शेकापला एका जागी विजय मिळवता आला आहे.

सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला. माढा, करमाळा, मोहोळ, माळशिरस या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार विजयी झाले. तर सांगोला मतदारसंघाने पुन्हा शेकापच्या देशमुख घराण्याला आपली साथ दिली आहे.

सांगोल्यात शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी महायुतीच्या शहाजीबापू पाटील यांना पराभवाची धूळ चाखवली. शिवसेना शिंदे गटाला बार्शी मतदारसंघातही पराभवाची धूळ चाखावी लागली. येथे परंपरागत सामन्यामध्ये शिवसेना उबाठाच्या दिलीप सोपल यांनी मनोज जरांगे यांना आडवे जाणा-या विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना पराभूत केले.

सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला. तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपच्या समाधान आवताडे यांनी शेवटच्या काही फे-यांमध्ये मुसंडी मारत निसटत्या मतांच्या फरकाने आपला विजय कायम ठेवला. करमाळा व माढा या दोन मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या मातब्बर शिंदे घराण्यातील काका व पुतण्या दोघांनाही यंदा पराभवाचा सामना करावा लागला हे यंदाच्या निवडणुकीचे मोठे वैशिष्ट्य राहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR