बारामतीसह ४ लोकसभा लढवणार : अजित पवार

रायगड : अजित पवार गटाच्यावतीने कर्जत येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये आजी-माजी आमदार खासदार आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले होते. शुक्रवारी या शिबिराचा शेवटचा दिवस होता. या शिबिरात बोलताना अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बारामतीसह ४ लोकसभा लढवणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या चार जागा तर आपण लढवणारच आहोत. याशिवाय ठाकरे गटाच्याही काही जागा लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न आणि काम करायचे आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त ४८ पैकी जास्तीत जास्त एनडीएच्या विचाराचे खासदार निवडणून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. आमच्यावर आरोप होते की गुन्हे दाखल होते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. विकास कामे व्हावी, यासाठी आपण सरकारमध्ये आलो आहोत. माझ्यावर जे आरोप झाले ते निर्णय मी एकट्याने घेतले नव्हते. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी होती, असेही ते म्हणाले.

निकालानंतर महाराष्ट्रातील जागांवर चर्चा
अजित पवार म्हणाले की, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा आपण लढवणार आहोत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होणार आहे. पाच राज्यातील निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होणार आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news