मान्सून वारे कमकुवत होणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात उष्णतेची विक्रमी तीव्र लाट पसरली आहे. त्यातच आता स्कायमेट या हवामान संस्थेने अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार झाल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे मान्सूनचे वारे कमकुवत होऊ शकते. यातून केरळसह दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा धोका आहे. पुढील आठवडाभर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरातसह १० राज्यांमध्ये कोरडे, उष्ण वारे वाहू शकतात. त्यामुळे मान्सून वारे कमकुवत राहण्याचा धोका आहे, असा अंदाज वर्तवला आहे.

या काळात याच राज्यांमध्ये कमाल तापमान ४५ अंश किंवा त्याहून अधिक प्रमाणात वाढू शकते. पश्चिमी प्रणाली कमकुवत झाल्याने आणि कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्यामुळे पावसाची शक्यता नाही. काल देशभरातील जवळपास २२ शहरांत ४५ अंश सेल्सिअसवर तापमान होते. तसेच उत्तर प्रदेशातील २२ जिल्ह्यांमध्ये ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.

दिल्लीत मंगळवारी या वर्षातील उष्णतेच्या लाटेचा चौथा दिवस नोंदवला गेला. सफदरजंग येथे कमाल तापमान ४५.१ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते तर रिज परिसरात ४६.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. पंजाबमधील फरिदकोट येथे तापमान ४७.३ अंशांवर पोहोचले. हरियाणातील रोहतक येथेही ४७ अंशांच्या जवळपास, नारनौल येथे ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब-याच राज्यांत पुढील काळातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मान्सूनचा दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश
भारतात मुसळधार पाऊस पाडणा-या नैऋत्य मान्सूनने मंगळवारी कोमोरिन समुद्र, श्रीलंका आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरातील काही इतर भाग व्यापले. त्याने दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. येत्या २-३ दिवसांत तो लक्षद्वीप बेटांमधील मिनिकॉय बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, पुढे मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news