28.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रशेंडगेंच्या मोटारीला चप्पलेचा हार, शाईफेक करत धमकीचा संदेश

शेंडगेंच्या मोटारीला चप्पलेचा हार, शाईफेक करत धमकीचा संदेश

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला चप्पलचा हार घालून शाईफेक करत धमकीचा संदेश चिकटवण्यात आला. अज्ञाताकडून हा प्रकार एका हॉटेलसमोरील वाहनतळावर लावण्यात आलेल्या मोटारीबाबत घडला.

शेंडगे हे स्वत: सांगली लोकसभा उमेदवार आहेत. हॉटेल समोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे. गाडी क्रमांक एमएच ०१ डी ००७३ ही फोर्चुनर गाडी आहे. या गाडीच्या काचेवर धमकीवजा इशारा देणारा मजकूर असणारा कागद चिकटवण्यात आला आहे.

प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही भुजबळाने जशी नाशिकमधून माघार घेतली तशी तू घे, मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू एक मराठा लाख मराठा असे पत्रकात लिहीले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR