26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयउपराष्ट्रपती धनखड यांची माफी मागा

उपराष्ट्रपती धनखड यांची माफी मागा

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांना सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी राघव चड्ढा यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची बिनशर्त माफी मागावी, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.

ऑगस्टमध्ये राज्यसभा अध्यक्षांनी राघव चड्ढा यांना निलंबित केले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राघव चड्ढा यांना माफी मागण्यात सांगण्यात आले आहे. राघव चड्ढा प्रथमच खासदार झाले असून, राज्यसभेचे तरुण सदस्य आहेत. त्यांच्या माफीचा सभापती गांभीर्याने विचार करतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेवर अ‍ॅटर्नी जनरल म्हणाले की, हे प्रकरण सभागृहाचे असल्याने चढ्ढा यांना राज्यसभेतच माफी मागावी लागेल. यावर, आम्हाला वाटते की हे प्रकरण सामंजस्याने सोडवले जाईल असे सर्वोच्च न्यायालायने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR