अमोल कोल्हे-अजित पवार भेटीमुळे तर्क-वितर्क

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजितदादांच्या अँटीचेंबरमध्ये ही भेट झाली. मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात आपण अजितदादांना भेटल्याचे अमोल कोल्हे म्हणाले मात्र अजित पवार गटाने दाखल केलेल्या कारवाईच्या पत्रात डॉ. कोल्हेंचे नाव नसणे आणि लगेचच झालेली ही भेट यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. कोल्हे यांनी मात्र आपण शरद पवार यांच्या सोबतच आहोत. निवडणुकीतदेखील मतदारसंघातील जनता आणि शरद पवार जे सांगतील तेच करू, असेही डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करण्याबाबतचे पत्र राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांना लिहिले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटानेही शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्याचे पत्र दिले आहे मात्र त्यात डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव मात्र समाविष्ट करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पत्रकारांना अधिकृत प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे यांनी, आपली ही भेट मतदारसंघातील विकास कामांबाबत होती, असे स्पष्ट केले.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांसाठी टर्शरी सेंटर नाहीत. वैद्यकीय उपचारांसाठी ग्रामीण जनतेला ७०-८० किलो मीटरचा पल्ला पार करून पुणे, मुंबईला जावे लागते. इंद्रायणी मेडीसिटी या प्रकल्पासाठी अजितदादांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून सकारात्मक भूमिका घेतली आहे. भेटीत या प्रकल्पासंदर्भातही चर्चा झाली. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा हीदेखील मागणी आहे त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर मतदारसंघ जोडला जाणार आहे. मतदारसंघातील या विकास कामांसंदर्भातच आपली अजितदादांसोबत चर्चा झाल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news