27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवकळंब येथे साडेसोळा लाखाची सुपारी चोरीला

कळंब येथे साडेसोळा लाखाची सुपारी चोरीला

धाराशिव : प्रतिनिधी
कळंब शहरातील तांदुळवाडी रोडवर असलेल्या सुपारीच्या गोडावून मधील साडेसोळा लाखाची सुपारी चोरीला गेली. चोरीची ही घटना २ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी कळंब पोलीस ठाणे येथे २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब शहरातील दत्तनगर भागात राहणारे महादेव मनोहरराव घुले यांचे तांदुळवाडी रोडवर रुणवाल बिल्डींगजवळ सुपारीचे गोडावून आहे. चोरट्यांनी त्यांचे सुपारीच्या गोडवुनच्या शटरचे कुलूप २ डिसेंबरच्या रात्री तोडले. गोडावून मधील सुपारीचे ४५ पोते त्याची किंमत १६ लाख ६० हजार १२५ रूपये आहे. ही सुपारीची ४५ पोती लंपास केली. या प्रकरणी फिर्यादी महादेव घुले यांनी दि.२ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पोलीस ठाणे येथे कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR