फाईव्ह स्टार हॉटेल्सना कोट्यवधींचा चुना लावणा-या बिंग्सन जॉनला अटक

रायपूर : थ्रिलर चित्रपटात शोभेल असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून कुप्रसिद्ध ठग आणि सिरीयल किलर चार्ल्स शोभराज याच्या गुन्हेगारी स्टाईलने प्रेरित होऊन देशातील तब्बल ३०० हून अधिक आलिशान फाईव्ह स्टार हॉटेल्सना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणा-या एका ६९ वर्षीय वृद्धाला रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. बिंग्सन जॉन असे या भामट्याचे नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. गेल्या तीन दशकांपासून बनावट ओळखपत्रांच्या आधारे हॉटेल्समध्ये मुक्काम ठोकून, बिल न भरताच रफूचक्कर होण्यात तो पटाईत होता.

अशी असायची ‘ऑपरेशन मॉडस ऑपेरंडी’
बिंग्सन जॉन हा इंग्रजी माध्यमात शिकलेला असून अत्यंत सफाईदारपणे इंग्रजी बोलायचा. हॉटेल्समध्ये संशय येऊ नये म्हणून तो कधी विदेशी पर्यटकांचा गाईड, कधी इंग्रजीचा प्राध्यापक, तर कधी योगा ट्रेनर असल्याचे सांगायचा. फाईव्ह स्टार हॉटेल्समधील कर्मचा-यांवर आपल्या उच्चशिक्षित राहणीमानाची आणि इंग्रजीची अशी काही भुरळ पाडायचा की, हॉटेल प्रशासन त्याच्याकडून कोणतीही अ‍ॅडव्हान्स रक्कम मागत नसे. काही दिवस आलिशान सोयी-सुविधांचा मोफत आस्वाद घेतल्यानंतर, कोणालाही थांगपत्ता लागू न देता तो तिथून पळ काढायचा. अनेकदा पळताना तो हॉटेलमधील महागड्या वस्तूही चोरून नेण्यात पटाईत होता.

रायपूरच्या ‘हायत’ हॉटेलमध्ये केली शेवटची चूक
काही दिवसांपूर्वी बिंग्सनने छत्तीसगडमधील रायपूर येथील प्रसिद्ध फाईव्ह स्टार ‘हॉटेल हायत’ला लक्ष्य केले. तिथे तो दोन दिवस राहिला. हॉटेलचे ६३ हजार ७५५ रुपयांचे बिल न भरताच, तो ‘ऑफिसच्या कामासाठी’ म्हणून हॉटेलचा १ लाख ४८ हजार रुपयांचा लॅपटॉप घेऊन पसार झाला. हॉटेल प्रशासनाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NANDED|नांदेडमध्ये पाकिस्तान कनेक्शन? FDA-पोलिसांची मोठी कारवाई
01:53
Video thumbnail
Nanded|पत्नी नांदायला येत नसल्याने युवक थेट हाय व्होल्टेज टॉवरवर चढला
01:24
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय?" आशाताई भिसेंचा सवाल
05:02
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
35:17
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56

Latest news