निवृत्त आरटीओच्या घरात सापडले घबाड

लखनौ : उत्तर प्रदेशात प्रादेशिक परिवहन अधिका-यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्या प्रकरणी कारवाई करÞण्यात आली. न्यायालयाने झडतीचे वॉरंट काढल्यानंतर अधिका-यांनी त्याच्या लखनौतील निवासस्थानी छापे टाकले असता मोठे घबाड सापडले आहे. रोकड, सोने चांदीसह मालमत्तांची कागदपत्रे आढळून आली आहेत.

ललित कुमार असे कारवाई करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे. लखनौतील अलीगंजमधील त्याच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर अधिका-यांचेही डोळे विस्फारले. घरात तब्बल १.६२ कोटींची रोकड सापडली आहे. घरात वेगवेगळ्या ठिकाणी पाकिटांमध्ये हे पैसे ठेवले होते. अजुनही कारवाई सुरू असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. विजिलन्स विभागानं टाकलेल्या छाप्यात घरात काही मौल्यवान वस्तूही सापडल्या आहेत. सोन्याच्या १३ किलोच्या वस्तू अधिका-याकडे सापडल्या. यात साखळ्या, विटा आणि दागिने यांचा समावेश आहे. तर चांदीच्या ९ किलोच्या साखळ्या, बिस्किटे आणि दागिने आढळून आले. याची एकत्रित किंमत जवळपास २० कोटी रुपये अंदाजे आहे.

ललित कुमारच्या घरात अनेक कागदपत्रेही आढळली आहेत. यात लखनौत अनेक ठिकाणी फ्लॅट आणि प्लॉट आहेत. याशिवाय लखनौ, बाराबंकी, रायबरेली जिल्ह्यात शेजतमीन आणि लखनौ, नोएडात फ्लॅट बूकिंग यांचा समावेश आहे. या जमिनींची आणि फ्लॅटची एकत्रित किंमत १२३ कोटी सांगितली जात आहे. अधिका-यांनी घरातून टोयोटा, इनोव्हा, ुंडाई आय २० कार आणि एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NANDED|नांदेडमध्ये पाकिस्तान कनेक्शन? FDA-पोलिसांची मोठी कारवाई
01:53
Video thumbnail
Nanded|पत्नी नांदायला येत नसल्याने युवक थेट हाय व्होल्टेज टॉवरवर चढला
01:24
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय?" आशाताई भिसेंचा सवाल
05:02
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
35:17
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56

Latest news