३५ क्षेपणास्त्र डागल्याचा व्हीडीओ जारी

तेहरान : इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा युद्धाची सुरुवात झाली आहे. शांतता करारानंतरही दोन्ही देश आमनेसामने आलेले असतानाच इराण सरकारने बुधवारी रात्री उशिरा पहिल्यांदाच आपले दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा अधिकृत व्हीडीओ जारी केला आहे. विशेष म्हणजे खामेनी यांच्या पार्थिवावर गुरूवार दि. ९ जुलै रोजी अन्त्यसंस्कार होणार आहे, त्याआधीच हा व्हीडीओ जारी करण्यात आला. तर दुसरीकडे अमेरिकेनेही याचवेळी इराणवर भीषण हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे आखातात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत.

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या तेहरानमधील मुख्य निवासस्थानाच्या विध्वंसाचे पहिले अधिकृत फुटेज इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त क्षेपणास्त्र हल्ल्यात ८६ वर्षीय खामेनी यांचा मृत्यू झाला होता. अमेरिका-इस्रायलने एकाचवेळी ३५ क्षेपणास्त्र डागली होती. या भीषण हल्ल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाची काय अवस्था झाली होती याची पहिली झलक या ३५ सेकंदांच्या व्हीडीओच्या माध्यमातून जगासमोर आली आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हीडीओमध्ये तेहरानमधील इमाम खोमेनी हुसैनिया या मुख्य सभागृहाची झालेली दुरवस्था स्पष्टपणे दिसत आहे. याच हॉलमध्ये खामेनी देशातील आणि परदेशातील महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका घेत असत, तसेच जनतेला संबोधित करत असत. व्हीडीओमध्ये इमारतीचे कोसळलेले छत, वाकलेले लोखंडी खांब आणि सिमेट-कॉक्रीटचे मोठे ढीग दिसत आहेत. यावरून अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याची तीव्रता किती भयंकर होती याचा अंदाज येतो.

कुटुंबीयांचाही मृत्यू
इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या १४ महिन्यांच्या नातीचा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृत्यू झाला होता. खामेनी यांचे पुत्र मोजताबा अली खामेनी हे या हल्ल्यात जखमी झाले होते. तेच आता इराणचे सर्वोच्च नेते आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NANDED|नांदेडमध्ये पाकिस्तान कनेक्शन? FDA-पोलिसांची मोठी कारवाई
01:53
Video thumbnail
Nanded|पत्नी नांदायला येत नसल्याने युवक थेट हाय व्होल्टेज टॉवरवर चढला
01:24
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय?" आशाताई भिसेंचा सवाल
05:02
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
35:17
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56

Latest news