‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये शिवरायांचा जयघोष

लंडन : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉर्ड्स ऑफ हाऊसमध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज जय महाराष्ट्रचा निनाद घुमला. एकनाथ शिंदेंना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाचे गौरविण्यात आले. या ऐतिहासिक सभागृहात मराठी भाषेचा एकच गजर झाला. विशेष म्हणजे यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार- जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून करून एकनाथ शिंदे यांनी भाषेचा अभिमान तर व्यक्त केलाच, पण महाराष्ट्राच्या विकासाची कहाणीही मांडली. आई-पत्नीच्या काबाडकष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली असे एकनाथ शिदेंनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. एकनाथ शिंदेंनी नमस्कार.. जय हिंद- जय महाराष्ट्र म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच, जय भवानी जय शिवाजी आणि भारत माता की जय.. अशी घोषणाबाजी करत भाषणाला सुरुवात केली.

रिस्पेक्टेड बेरोनेस… म्हणत एकनाथ शिंदेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच ब्रिटनच्या संसदेत मला भाषण करण्याची संधी मिळतेय हा माझ्यासाठी बहुमान असल्याचे म्हटले. तसेच, आपल्या भाषणात त्यांनी, महाराष्ट्र सरकाने जनहितासाठी केलेल्या कामाची माहिती देत, महिला सक्षमीकरणावर भर दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गेमचेंजर योजना ठरल्याची माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिदेंना देण्यात आलेल्या पुरस्काराबात त्यांनी आभार मानले, तसेच, महाराष्टाच्या १२ कोटी लोकांचा हा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत २०४७ च्या ध्येयाचा उल्लेख करत महाराष्ट्राने विकासाची गती पडकली आहे. मुंबई आणि लंडन हे जगातील दोन मोठे आर्थिक केंद्र असल्याचेही त्यांनी म्हटले.

सुरेश भटांच्या कवितेचा उल्लेख
एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात सुरेश भटांच्या कवितेचा उल्लेख केला, लाभले आम्हास भाग्य जाणतो मराठी… ही कविता म्हणून दाखवत मातृभाषण मराठी आणि महाराष्ट्राची ओळख ब्रिटनच्या संसदेला करुन दिली. तसेच, मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध योजनांचा उल्लेख आणि जनहितासाठी या योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अंमलबजावणीची माहिती दिली.

इंग्रजीने लक्ष वेधले
इट इज अ पिपल सेंट्रीक अप्रोच ऑफ टू द पब्लिक सर्व्हीस… म्हणत एकनाथ शिदेंनी फाडफाड इंग्रजीतून केलेल्या आपल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील गेमचेंजर लाडकी बहीण योजना ही काही चॅरिटी नाही तर महिलांच्या सबलीकरणाची योजना बनली. जागतिक स्तरावरील संस्थांकडून लाडकी बहीण योजनेची दखल झाल्याचे उपमुख्यमंत्र्­यांनी म्हटले. त्यासह, शासन आपल्या दारी योजनेमुळेही लाखो लोकांचा फायदा झाला,केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही, तर विकास लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे असते, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेटचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46

Latest news