छत्रपती संभाजीनगर: ‘एआय’चा वापर करून कोट्यवधींच्या जमिनी लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हायटेक जमिनी घोटाळ्याने खळबळ

छत्रपती संभाजीनगर: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनी लाटल्याचा एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातून समोर आला आहे. नाशिकच्या मालेगावमधील एका अट्टल टोळीने एआय टूल्स आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल २० ते २५ कोटी रुपयांची मालमत्ता मूळ मालकाला थांगपत्ता लागू न देता परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हायटेक बनावट दस्तावेज घोटाळ्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या रॅकेटचा बळी ठरलेले अलिअजगर पेटीवाला हे छत्रपती संभाजीनगरच्या हिरापूर (शिरपूर) परिसरातील ५ एकर ११ गुंठे जमिनीचे मालक आहेत. आजच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. भामट्यांनी तब्बल ४० ते ४५ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून या जमिनीचे ‘हिबानामा’ (बक्षीसपत्र) दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करून घेतले. विशेष म्हणजे, या अधिकृत दस्ताऐवजावर अलिअजगर पेटीवाला यांचाच फोटो लावण्यात आला होता.

मात्र, प्रत्यक्षात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पेटीवाला यांच्यासारखाच हुबेहूब दिसणारा चेहरा तयार करून नोंदणी कार्यालयात एक डमी व्यक्ती उभी करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दिवशी हा व्यवहार झाला, त्या दिवशी पीडित पेटीवाला एका नातेवाईकाच्या उपचारासाठी रुग्णालयात होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते चालण्यास असमर्थ होते, परंतु नोंदणी कार्यालयात उपस्थित असलेला ‘डमी’ पेटीवाला मात्र अगदी सहजपणे चालताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे.

हे आंतरजिल्हा रॅकेट अत्यंत संघटित असून ते प्रामुख्याने ज्या जमिनींचे मालक परदेशात आहेत किंवा ज्या मालमत्तेकडे मूळ मालक अनेक वर्षांपासून फिरकले नाहीत, अशा जमिनींना लक्ष्य करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक ठिकाणी अशाच प्रकारे जमिनी लाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अलिअजगर पेटीवाला यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत जुनेद खान आणि मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ या दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या टोळीविरोधात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मिळून आतापर्यंत फसवणुकीचे १६ गुन्हे दाखल झाले असून, पोलीस या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी कसून तपास करत आहेत. एआयच्या अशा गैरवापरामुळे मालमत्ता धारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news