34 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमार्केटमध्ये डार्क पारले-जी?

मार्केटमध्ये डार्क पारले-जी?

फोटो पाहून ग्राहकांची उत्सुकता वाढली सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मुंबई : आता पारले-जी कंपनी नवीन फ्लेवरची बिस्किटं बाजारात आणत असल्याचं बोललं जात आहे. या ‘डार्क पारले-जी’चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक या बिस्किटावर मीम्स देखील बनवत आहेत.

दरम्यान, सध्या अनेक व्हरायटी बिस्किटात उतरल्या असल्या तरी बिस्किट म्हटल्यावर एक नाव समोर येते ते म्हणजे पारले-जी. मार्केटमध्ये आता अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या दाखल झाल्या असल्या तरी पारले-जीचा दबदबा कायम आहे. पारले-जी हे भारताचे आवडते आणि खूप जुने बिस्किट आहे. ८५ वर्षांपूर्वी बाजारात आलेला चहासोबतचा हा लोकांचा आवडता नाश्ता आज देशातील सर्वाधिक विकल्या जाणा-या ब्रँडपैकी एक आहे.

एआय वापरून फोटो तयार केला असण्याची दाट शक्यता आहे. इंटरनेटवर ट्रेंड होत असलेल्या डार्क पारले-जी पॅकेटवर पारलेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, पारलेच्या वेबसाईटवर किंवा कोणत्याही सोशल मीडिया हँडलवर डार्क पारले-जी बद्दल माहिती दिली नाही. मात्र डार्क पारले-जी च्या फोटोमुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

नेटकरी जोरदार मीम्स व्हायरल करत आहेत. एका नेटक-याने लिहिले, ‘‘आजी खरं सांगत होती की चहा पिणारे काळे होतात.’’ एकाने लिहिले की, ‘‘चहाने पारलेसोबत ब्रेकअप केल्यामुळे पारले गडद काळा झाला.’’

एआय किंवा इतर काही साधनांचा वापर करून फोटो बनावट असल्याचे दिसले. मात्र, हे खरे आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी कोणतीही अधिकृत माहिती नाही. पारलेने देखील आत्तापर्यंत या प्रतिमेवर काहीही भाष्य केलेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR