मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना ताजी असतानाच, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी एक मोबाईल नंबर शेअर करत आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, एका इसमानी दोन ते तीन वेळा मला फोन केला, भ्रमणध्वनीवर अर्वाच्च भाषेत बोलून मारण्याची धमकी दिली.
या धक्कादायक प्रकारानंतर आव्हाड यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित मोबाईल नंबरवर कॉल केला असता, त्या व्यक्तीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला पण गोळ्या घालेन, घरच्या बाहेर येऊन गेलो, असे त्या व्यक्तीने वाणी यांना सांगितले. या अत्यंत गंभीर प्रकारानंतर हेमंत वाणी यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली आहे.
















