किनगाव : प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथे घरातील फ्रीजला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या पथकास पाचारण करण्यात आले होते परंतु तोपर्यंत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. जिवीत हानी टळली मात्र जवळपास ५ लाखाचे नुकसान झाले असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले ग्राम महसूल अधिकारी सुयोग कुलकर्णी यांनी पंचनामा केला आहे.
विळेगाव येथील मुरारी विठ्ठलराव डुब्बेवार यांच्या घरी फ्रिजला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घरातील मंडळी धावपळ करून घराबाहेर पडले त्यामुळे जीवित हानी झाली नाही परंतु घरातील फ्रिज, कपाट , कपडे , पैसे , डब्बे , धान्य जळून खाक झाले. घरातील नगदी रोख २ लाख रुपये जळले असून दिपाली विवेकानंद डुब्बेवार या बचत गटातील ग्रामसंघात काम करतात. त्यांच्या गटाची रक्कमही जळून गेली असून असे एकून ५ लाखांचे जवळपास नुकसान झाले आहे. अग्नीशामक दलास पाचारण करण्यात आले परंतु तोपर्यंत घरातील वस्तू जळून गेल्या.
















