लातूर : प्रतिनिधी
उपेक्षीत लोककलावंत मजूर व निराधार पुनर्वसन संघटनेच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी देण्यात आले. रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत या मागणीसह अन्य विविध मागण्याचे निवेदन लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शिवाजी जवळगेकर यांच्या उपस्थितीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत बीबीनवरे टाकळीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीयकृत बँका यांनी वाटप केलेले नवीन व जुने कर्ज माफ करण्यात यावे, सर्व शेतमजूर, आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी व्यक्तीस प्रति महिना ३० किलो धान्य मोफत देण्यात यावेत, सर्व मायक्रो फायनान्स बचत गट यांच्याकडून वितरण करण्यात आलेले कर्ज हप्ते वर्षभरासाठी थांबवून सदरील कालावधित या रकमेस व्याज किंवा दंड आकारण्यात येऊ नये, संबधित फायनान्सच्या एजंटाकडून सक्तीची वसुली थांबविण्यात यावी व शेतमजुरास प्रति महिना ५ हजार रुपयांचे अर्थसा खात्यात जमा करण्यात यावेत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले.
निवेदनावर सत्यवान कांबळे, सुभाष हनमंते, बालाजी पाटील, उध्दव शिंदे, गोकूळ दंतराव, संजय सूर्यवंशी, अॅड. सुरेंद्र कांबळे, अनंत दोरवे, प्रकाश गायकवाड, लक्ष्मण रणदिवे, रवी मोतीरावे, राजू सोनकांबळे, सुनील कांबळे, संतराम मोठेराव, अरुण दंतराव आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
















