आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी दोन सामने पार पडले. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात न्यूझिलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. तर दुसरा सामना हा इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला. पाकिस्तानने ‘करो या मरो’ स्थितीत न्यूझिलंडवर २१ धावांनी डीएलएसनुसार विजय मिळवला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर न्यूझिलंडने पराभवाचा चौकार लगावला. न्यूझिलंडला पराभवामुळे वर्ल्ड कप सेमी फायनल मोहीम आता आणखी अवघड झाली आहे. न्यूझिलंड सलग चौथ्या पराभवाच्या धक्क्यातून सावरला नाही न्यूझिलंडने बंगळुरूच्या मैदानावर ४०१ धावांचा डोंगर उभारला. राचिन रवींद्रने शतक झळकावले तर कर्णधार केन विल्यम्सनने ९५धावा केल्या.
पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाली तेव्हा पावसाने दोनदा व्यत्यय आणला आणि पावसाच्या डीएलएसमुळे न्यूझिलंडचा विजय हिरावून घेतला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. १९९२च्या बेन्सन अँड हेजेस विश्वचषक स्पर्धेत डीएलएसमुळे दक्षिण आफ्रिकेची संधी हुकली होती. या सर्व उलटफेरांमुळे स्पर्धेमध्ये आता खरी रंगत येईल.
हेडरमधील दुस-या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ३३ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग पाचवा विजय ठरला. ऑस्ट्रेलिया अशा पद्धतीने सेमी फायनलच्या दिशेने आणखी पुढे गेलीय. तर इंग्लंड वर्ल्ड कपमधून बाहेर पडला.
विश्वचषकाच्या गुणतालिकेचा विचार केला, तर पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिका संघाला मिळाला. उपान्त्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेचे स्थान न्यूझिलंडच्या पराभवानंतर निश्चित झाले. पाकिस्तानने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून, न्यूझिलंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपान्त्य फेरीतील तीन आणि चार क्रमांकाचे संघ बनण्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तानच्या विजयामुळे मात्र दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे सेमी फायनलमध्ये आता ४ पैकी २ जागा बूक झाल्यात. तर २ जागा रिकाम्या आहेत. न्यूझिलंडसाठी सेमी फायनलचे समीकरण बिघडलेले असताना इथे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केले. ऑस्ट्रेलिया या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझिलंडला पछाडत तिस-या स्थानी पोहोचली. त्यामुळे न्यूझिलंडची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली.
न्यूझिलंडसह पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांचे ८-८ गुण असल्याने न्यूझिलंडचा नेट रन रेट हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या तुलनेत बरा असल्याने ते चौथ्या ठिकाणी आहे. मात्र ऑस्ट्रेलिया विजयी झाल्याने न्यूझिलंडचे निश्चित एका स्थानाचे नुकसान झालेय. न्यूझिलंडने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये नऊपैकी ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी पहिल्या चार सामन्यांत विजय मिळवला. न्यूझिलंडने अनुक्रमे इंग्लंड, नेदरलँड्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तानवर मात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने पराभूत केल्यानंतर न्यूझिलंड विजयी ट्रॅकवरून घसरली. न्यूझिलंडने टीम इंडियानंतर सलग ३ सामने गमावले.
न्यूझिलंडला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर पाकिस्तानने पराभूत केले.विश्वचषकाच्या गुणतालिकेचा विचार केला, तर पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिका संघाला मिळाला. उपान्त्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेचे स्थान न्यूझिलंडच्या पराभवानंतर निश्चित झाले. पाकिस्तानने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून, न्यूझिलंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपान्त्य फेरीतील तीन आणि चार क्रमांकाचे संघ बनण्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.
न्यूझिलंड वर्ल्ड कप मोहिमेतील अखेरचा सामना हा ९ नोव्हेंबर रोजी श्रीलंकाविरुद्ध खेळणार आहे. त्यात न्यूझिलंडला विजय मिळवावाच लागेल. पाकिस्तानला इंग्लंडबरोबर लढत द्यावयाची आहे. कांगारूंना अफगाणिस्तान व बांगलादेश या कमकुवत संघांशी लढायचे आहे.
या सर्व अनपेक्षित घडामोडींमुळे कोणता संघ पहिल्या क्रमांकावर येईल ते सांगणे अवघड आहे. कारण क्रमवारीत पहिला येणारा संघ चौथ्या संघाबरोबर मुंबईत खेळणार आहे तर दुसरा आणि तिसरा संघ कलकत्त्यामध्ये लढत देणार आहे. यात सुद्धा आणखी एक गोम आहे ती पाकिस्तान जर सेमी फायनलला पोहोचले तर पाकिस्तानचा सामना मुंबईत न होता तो कोलकात्याला होईल.
मैदानाबाहेरून
– डॉ. राजेंद्र भस्मे कोल्हापूर,
मोबा. ९४२२४ १९४२८