गुरूग्राम : हॉटेलमध्ये जेवणानंतर माऊथ फ्रेशनर दिले जाते. पण, ते खरंच माऊथ फ्रेशनर आहे का हे तपासून घ्यायला हवे. हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या झाल्या, पाच जणांची प्रकृती बिघडली असून दोन जण अत्यवस्थ आहेत.
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमध्ये रेस्टॉरंटमध्ये लोकांना माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस देण्यात आणि तो खाल्ल्याने ग्राहकांच्या तोंडातून रक्त येऊ आले. यामुळे पाच जणांची प्रकृती बिघडली. या पाच जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यातील दोन जण अत्यवस्थ आहेत.
अंकित कुमार नावाच्या व्यक्तीने रेस्टॉरंटविरोधात आरोप केले असून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या शनिवारी तीन जोडप्यांचा ग्रुप वाढदिवस साजरा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्यांच्या जेवणानंतर, वेट्रेसने ग्रुपला माउथ फ्रेशनर ऑफर केले, परंतु त्याऐवजी त्यांना कोरड्या बर्फाचे दाणे दिले, ज्यामुळे त्यांची जीभ आणि टाळू खराब झाली, असे पोलिस आणि रेस्टॉरंटने सांगितले.
हरियाणाच्या गुडगावमधील एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर म्हणून सर्व्ह केलेल्या ड्राय आईस म्हणजे कोरड्या बर्फामुळे ग्राहकांच्या तोंडातून रक्त आले. वाढदिवस साजरा करण्यासाठी वेट्रेसने ग्राहकांना चुकून ड्राय आईस दिल्याचे सांगितले जात आहे.
ड्राय आईस म्हणजे काय?
ड्राय आईस म्हणजे कोरडे बर्फ. याचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये केला जातो. ड्राय आईस कार्बन डाय ऑक्साईडचे घनरूप आहे, जे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे, कारण ड्राय आईस वायू स्वरूपात रूपांतरित होतो. ग्राहकांना ड्राय आईसच्या माध्यमातून विषबाधा करून नुकसान केल्याच्या आरोपाखाली वेट्रेसवर गुन्हा दाखल करण्यात आला आह