28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
HomeFeaturedलोकसभेसाठी ७ टप्प्यात मतदान शक्य!

लोकसभेसाठी ७ टप्प्यात मतदान शक्य!

१४ मार्चला निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होण्याची शक्यता

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून १४ मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ प्रमाणेच यंदाही सात टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. एप्रिलच्या दुस-या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता अधिक दिसते.

१६ जून २०२४ रोजी १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, सध्या निवडणूक आयोग देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्याचा दौरा करुन आढावा घेत आहेत. सर्व राज्यातील तयारीचा आढावा घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप ३०३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत या निवडणुकांमधून सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली होती. त्यापैकी ७८ खासदार महिला आहेत.

कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान…
पहिला टप्पा- जम्मू आणि कश्मीर, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नागालँड, ओडिशा, सिक्किम, तेलंगाणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान, लक्षद्वीप.
दूसरा टप्पा- आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तामिलनाडु, त्रिपुरा, यूपी, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी.
तिसरा टप्पा- आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव.
चौथा टप्पा – बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल.
पाचवा टप्पा- राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू और कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश.
सहावा टप्पा- बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली-एनसीआर.
सातवा टप्पा- उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंडीगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR