गणेशोत्सवाची आर्थिक उलाढाल १ लाख कोटींच्या पुढे!

नवी दिल्ली/पुणे : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या महागाईमुळे देशाच्या अर्थचक्राला चालना देणा-या गणेशोत्सवाची आर्थिक उलाढाल यंदा एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१५ मध्ये सुमारे २० हजार कोटी असलेली देशभरातील गणेशोत्सवाची आर्थिक उलाढाल ही अवघ्या अकरा वर्षांत ५.७५ पट वाढल्याचे दिसते. महाराष्ट्रात मुख्यत्वे पुणे आणि मुंबई ही बाजारपेठेची मुख्य केंद्रे मानली जातात. यंदा पुणे जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात तब्बल १० हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता रिटेल महासंघाने वर्तविली आहे.

यंदाचा गणेशोत्सव महिन्याच्या मध्यावर आल्याने नोकरदार वर्गाकडे पैसा उपलब्ध असून, बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. गणेशोत्सवाबाबत व्यापारी वर्गात मोठा उत्साह दिसून येत आहे. पुण्यात नोंदणीकृत व्यापारी सुमारे अडीच ते तीन लाख असले, तरी घरगुती व्यवसाय करणा-या महिला, मूर्तिकार, मंडप व्यावसायिक, मिठाई, विद्युत रोषणाई अशा तब्बल १५० हून अधिक विविध क्षेत्रांतील सुमारे ७ ते ८ लाख छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा रोजगारनिर्मितीचा महत्त्वाचा उत्सव मानला जातो. सध्या महागाईमुळे कच्चा माल, वाहतूक आणि मजुरी वाढली असली, तरी सणाचा उत्साह पाहता नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.

घरगुती खर्चात २० टक्क्यांनी वाढ
वाढत्या महागाईमुळे पुण्यातील घरगुती गणेशोत्सवाच्या खर्चात किमान १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याचे नागरिक आणि व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गतवर्षी पाच दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवासाठी २० ते २५ हजार खर्च करणा-या काही कुटुंबांचे यंदाचे अंदाजपत्रक ३२ ते ३५ हजारांपर्यंत पोहोचले आहे. मूर्ती, सजावट, प्रसाद, विद्युत रोषणाई, पाहुण्यांसाठी अल्पोपहार आणि विसर्जन अशा सर्वच बाबींवरील खर्च वाढला आहे.

गणेशमूर्तींच्या किमतीत ३० टक्के वाढ
महागाईची झळ यंदा गणरायाच्या मूर्तीलाही बसली आहे. पुण्यात गणेशमूर्तींच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. मूर्ती रंगविण्यासाठी वापरण्यात येणा-या काही रंगांच्या दरात वर्षभरात किलोमागे ४५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, थिनर, ब्रश, वीज, इंधन, वाहतूक आणि कुशल कारागिरांची मजुरी महागल्याने मूर्तिकारांचा उत्पादनखर्च वाढला आहे. गतवर्षी २,५०० ते ३,००० रुपयांच्या दरम्यान मिळणा-या काही लहान मूर्तींसाठी यंदा जवळपास ४,००० रुपये मोजावे लागत आहेत.

वर्ष ————- अंदाजित उलाढाल
२०१५ ———- .२० हजार कोटी
२०१६———– २५,हजार कोटी
२०१७ ———- ३१ हजार कोटी
२०१८———- ३७ हजार कोटी
२०१९———- ४६ हजार कोटी
२०२०-२१—— – कोरोना कालावधी
२०२२ ———- ५५ हजार कोटी
२०२३ ——— – ६६ हजार कोटी
२०२४———– ८० हजार कोटी
२०२५ ——— – ९६ हजार कोटी
२०२६ ——– १ लाख १५ हजार कोटी

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31
Video thumbnail
Nanded|मनोज जरांगे यांच्याबद्दल कॉमेंट करणाऱ्या नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस
00:46
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26

Latest news