झोपेअभावी हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकालाच जमत नाही. ज्याचा गंभीर परिणाम शरीरातील अवयवांना भोगावा लागतो. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकांच्या झोपेच्या वेळा अनियमित झाल्या असून मानसिक ताण देखील वाढत चालला आहे. अपूर्ण झोप आणि दीर्घकालीन तणावाचा थेट परिणाम हा हृदयाच्या आरोग्यावर होतोय. आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, तणाव आणि अपुरी झोप हे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात.

याबाबत नवी मुंबईतील वाशी येथील न्यूईरा हॉस्पिटलचे कार्डिओलॉजीस्ट डॉ. गौरव सुराणा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हृदयाच्या स्रायूंचे आरोग्य बहुतेकदा केवळ आहार, व्यायाम आणि जीवनशैलीच्या सवयींशी जोडले जाते, परंतु दीर्घकालीन तणाव आणि झोपेचा अभाव हृदयासाठी तितकाच हानिकारक ठरतो आहे. दीर्घकाळापर्यंत ताण आणि निद्रानाश हे शारीरिकसंतुलन बिघडवतात, रक्तदाबाची समस्या, हार्मोनल बदलांना कारणीभूत ठरतात आणि हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करतात. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि जीवघेणी गुंतागुंत टाळण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले राखणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

हृदयाच्या समस्या या चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे उद्भवतात. याव्यतिरिक्त तणाव, अपुरी झोप, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अनुवांशिक घटक देखील यास कारणीभूत ठरतात. तणावामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. छातीत दुखणे, धडधडणे, चिडचिड आणि थकवा ही लक्षणे दिसून येतात. शिवाय, झोपेची गुणवत्ता खालावणे हे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाशी जोडले जाते. दीर्घकाळापर्यंत झोप न येणे हे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते आणि हार्ट फेल्युअरची शक्यता वाढवू शकते असे डॉ. गौरव सुराणा यांनी स्पष्ट केले.

हृदयाच्या आरोग्यासाठी झोप आवश्यक
डॉ. गौरव सुराणा पुढे सांगतात की, वाढता तणाव आणि अपुरी झोप हे हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम करतात. झोप ही शरीराची नैसर्गिक दुरुस्तीची एक योग्य वेळ मानली जाते. योग्य विश्रांतीशिवाय, हृदय जास्त वेळ काम करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अगदी हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. हृदयाच्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाइतकेच ताणतणावाचे व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे. नियमित ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणे, झोपेचे वेळापत्रक पाळणे, झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन किंवा गॅझेट्सचा वापर टाळून निद्रानाश किंवा तणावासाठी वैद्यकीय मदत घेऊन घातक हृदयरोग टाळणे गरजेचे आहे.

कोणत्या वयोगटासाठी किती झोप हवी?
राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या मते १८ ते ६४ वयोगटातील प्रौढांसाठी ७-९ तासांची झोप आणि ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकसंख्येसाठी ७ ते ८ तासांची झोप गरजेची आहे. प्रत्येकाने आपल्या हृदयाचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, तणावमुक्त जीवनशैली जगणे आणि चांगल्या झोपेच्या सवयीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news