30 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रजगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ

प्राचीन मंदिरांसह जैव विविधता धोक्यात

बुलडाणा : नैसर्गिक उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा खा-या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराची पाण्याची पातळी २.६९ मीटरने वाढली आहे. त्यामुळे लोणार सरोवरात असलेली प्राचीन मंदिरे आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. अचानक गेल्या तीन ते चार वर्षांत सातत्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने लोणार सरोवराच्या अभ्यासकांनाही चिंतेत टाकले आहे.

उल्कापातामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराच्या जल पातळीत गेल्या दोन वर्षांत २.६९ मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे लोणार सरोवर काठावरील असलेल्या दहाव्या आणि बाराव्या शतकातील बगिचा महादेव मंदिर, अंबरखाना महादेव मंदिर, मोर महादेव मंदिर पाण्याखाली गेली आहेत. तर कमळजा मातेचे असलेले प्रसिद्ध मंदिर तिन्ही बाजूने पाण्याने वेढले गेले आहे. यापूर्वी सरोवराच्या जल पातळीत वाढ कमी होती. वर्तमान स्थितीत ती कमी न होता वाढत असल्याने सरोवरात असलेली जैवविविधताही धोक्यात आली आहे आणि त्यामुळे हा संशोधनाचा व चिंतेचा विषय झाला आहे.

लोणार सरोवर परिसरात अनेक विकास कामे झाली तर रस्त्याचीही बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच लोणार तालुक्यात जलसंधारणाची कामे झाली आणि त्यामुळे पाणी साठून लोणार सरोवरातील झरे हे प्रभावित झाले. त्यामुळे लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर लोणार सरोवराचे पाणी हे अल्कधर्मी असल्याने आता पाण्याच्या गुणधर्मातही बदल होत असल्याने लोणार सरोवरातील जैवविविधता ही धोक्यात आली असल्याचे लोणार सरोवराचे अभ्यासक सचिन कापुरे यांनी सांगितले आहे.

स्थानिकांची चिंता वाढली
लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने या सरोवराच्या काठावर असलेल्या अनेक मंदिरांत पाणी घुसले आहे तर अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे ही प्राचीन मंदिरे व त्यांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे आशिया खंडातील सर्वांत मोठे सरोवर आहे तर जगातील दोन नंबरचे खा-या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवर परिसरात अनेक विकास कामे झाली तर जलसंधारणाचीही कामे झाली आहेत. त्यामुळे या सरोवरातील झरे प्रवाहित झाले आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे लोणार सरोवराची जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. त्यामुळे आता अभ्यासकांनाही चिंता वाटू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR