33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रनांदेडमध्ये आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर हल्ला

नांदेडमध्ये आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर हल्ला

मराठा आंदोलकांनी कार फोडली; मोहन हंबर्डे सुरक्षित

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. त्यातच शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास गावात कीर्तनाच्या कार्यक्रमाला आलेल्या नांदेड दक्षिणच्या काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. नांदेड शहरालगत असलेल्या पुंड पिंपळगाव येथे ही घटना घडली.

दरम्यान, गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळत आहे. नांदेडमधील पिंपळगाव निमजीमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. या अधिवेशनाआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत.

सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. याच मागणीसाठी बुधवारी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होती. राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात ही घटना घडली आहे. आमदार मोहन हंबर्डे हे या भागात कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. याचवेळी मराठा आंदोलकांनी आमदार हंबर्डे यांची कार फोडली. या घटनेत आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित आहेत.

मी घरचा माणूस आहे, तरीही रागातून माझी गाडी फोडली : आमदार हंबर्डे
आरक्षणासाठी मराठा समाज आता घरच्या माणसाला देखील सोडत नाही. मी घरचा माणूस आहे, तरीही रागातून माझी गाडी फोडली. यावरून सरकारने समजून घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नांदेड येथील आमदार मोहन हंबर्डे यांनी दिली आहे. गाडी फोडल्याचा मला राग होता. पण त्यांची मागणी रास्त आणि न्यायिक असल्याने मी पोलिसांत तक्रार केली नाही. मराठा समाज आता घरच्या माणसाला देखील सोडत नाही. माझी गाडी फोडली यावरून सरकारने समजून घ्यायला पाहिजे, असे मोहन हंबर्डे म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR