अंतरिक्षात चमकणार भारताचे ‘डायमंड लोटस’!

बंगळुरू : भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्र सध्या जगभरात नाव कमावत आहे; परंतु यावेळी जी गोष्ट घडणार आहे, तिची कल्पना कदाचितच कोणी केली असेल! भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-१’ आपल्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे, या सफरीत त्याच्यासोबत कोणतीही सामान्य मशिन नसून, अंतराळात चमकण्यासाठी हि-याचे एक अनोखे कमळ पाठवले जात आहे. बंगळुरूमधील कुशल कारागिरांनी प्रयोगशाळेत हे मौल्यवान आणि अद्भूत कमळ तयार केले आहे.

बंगळुरूमधील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड ‘कॉस्मस डायमंडस्’ने घोषणा केली आहे की, त्यांनी तयार केलेले एक अतिशय देखणे लॅब-ग्रोन डायमंड लोटस या ऐतिहासिक मोहिमेचा भाग असणार आहे. भारतात तयार झालेले ‘लॅब-ग्रोन’ (प्रयोगशाळेत विकसित केलेले) हि-याचे कोणतेही कलाकुसर असलेले आर्टवर्क अंतराळ प्रवासावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नक्की काय पाठवावे, यावर अनेक महिने चर्चा सुरू होती. सुरुवातीला एखादा मोठा हिरा किंवा एखादा खास जेमस्टोन कट पाठवण्याचा विचार झाला; परंतु शेवटी भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाची निवड करण्यात आली.

भारतीय संस्कृतीत आणि प्राचीन मंदिरांमध्ये कमळाला पवित्रता, निर्मिती आणि ज्ञानाचे प्रतीक मानले गेले आहे. या डायमंड लोटसच्या केंद्रभागात सोन्याचा वापर करण्यात आला आहे, जो भारतीय संस्कृतीतील देवतांचे आसन दर्शवतो. हे कमळ केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर अंतराळातील अत्यंत खडतर वातावरणाचा सामना करण्यासाठी ते खास पद्धतीने डिझाईन केले गेले आहे. रॉकेट लाँचिंगच्या वेळी होणारे तीव्र कंपन आणि प्रचंड दाब सहन करण्यासाठी या डायमंड लोटसच्या अनेक कडक संरचनात्मक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हिरा जगातील सर्वांत कठीण वस्तूंपैकी एक आहे. लाँचिंगदरम्यान या हि-याचा एकही तुकडा वेगळा होणार नाही, याची इंजिनीअरनी पूर्ण काळजी घेतली आहे.

‘विक्रम-१’ रचणार इतिहास
हा अनोखा पेलोड घेऊन जाणारे ‘विक्रम-१’ रॉकेट ‘स्कायरूट एअरोस्पेस’ या कंपनीने तयार केले आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्याचा प्रयत्न करणारे हे भारताचे पहिले खासगीरीत्या विकसित केलेले रॉकेट आहे. जरी हा हिरा कोणताही वैज्ञानिक पेलोड नसला, तरी अंतराळात भारतीय नवसंशोधन, कारागिरी आणि संस्कृतीचा डंका वाजवण्यासाठी तो पाठवला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पुन्हा अतिक्रमण!कारवाईनंतर आठवड्यातच जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पुन्हा गजबजला
02:58
Video thumbnail
Latur|विठ्ठल कांगणे मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
09:34
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार; ऑफलाइन परीक्षेसाठी लातूरात महामोर्चा
01:53
Video thumbnail
Parbhani Breaking News|परभणीत खळबळ! महापौरांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न
03:05
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर हादरलं! नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या
01:36
Video thumbnail
पुण्यात माऊलींच्या पालखीचे अलोट उत्साहात स्वागत; दगडूशेठ गणपती मंडळाकडून पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी!
01:05

Latest news