कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली : सुमारे साडे पाच वर्षांपूर्वी कोविड-१९ च्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन करावे लागले होते. दरम्यान कोरोनाच्या विषाणूंमुळे नर उंदरांच्या शुक्राणूंमध्ये बदल होत असल्याची आणि त्यामुळे त्यांच्या पुढील अपत्यांमध्ये चिंता वाढल्याची माहिती नव्या अध्ययनामधून समोर आली आहे. ही बाब कोरोनामुळे निर्माण झालेली दीर्घकाळापर्यंत चालणारी समस्या असू शकते. तसेच त्याचा पुढील पिढ्यांवर परिणाम होऊ शकतो.

सुमारे साडे पाच वर्षांपूर्वी कोविड-१९ च्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन करावे लागले होते. दरम्यान कोरोनाच्या विषाणूंमुळे नर उंदरांच्या शुक्राणूंमध्ये बदल होत असल्याची आणि त्यामुळे त्यांच्या पुढील अपत्यांमध्ये चिंता वाढल्याची माहिती नव्या अध्ययनामधून समोर आली आहे. ही बाब कोरोनामुळे निर्माण झालेली दीर्घकाळापर्यंत चालणारी समस्या असू शकते. तसेच त्याचा पुढील पिढ्यांवर परिणाम होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे फ्लोरी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्स अँड मेंटल हेल्थच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. ही माहिती १२ ऑक्टोबर रोजी नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेल्या नरापासून जन्माला आलेल्या सर्व अपत्यांवर परिणाम झालेला दिसल. विशेषकरून मादी मुलांच्या मेंदूतील हिप्पोकेंपस भागातील काही जीनचं वर्तन बदललेलं दिसले. याबाबत कॅरोलिना गुबर्ट या शास्रज्ञाने सांगितले की, हा बदल एपिजेनेटिक इनहेरिटेंस आणि मेंदूच्या विकासात झालेल्या गडबडीमुळे होऊ शकतो. त्यामुळे चिंता करण्याचे प्रमाण वाढते.

कोविडच्या संसर्गाचा अपत्यावर दीर्घकाळासाठी होणारा परिणाम दर्शवणारे हे पहिलेचअध्ययन आहे. या विषाणूने नराच्या शुक्राणूंमधील आरएनएमध्ये बदल घडवून आणला. हा आरएनए मेंदूचा विकास करणा-या जिनवर नियंत्रण ठेवतो. इन्स्टिट्यूटमधील प्रमुख संशोधक अँथोनी हेनन यांनी सांगितले की, या संशोधनामधून कोविड १९ च्या साथीचा परिणाम येणा-या पिढ्यांवर पडू शकतो असे दिसून येत आहे.

मात्र सध्यातरी हे संशोधन उंदरांवर करण्यात आले आहे. मात्र मनुष्यांवर संशोधन होणे बाकी आहे. जर हे संशोधन माणसांवर करण्यात आले तर जगभरातील लाखो मुले आणि त्यांचे कुटुंबीय प्रभावित होतील, हा सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका आहे असे हेनन यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा फैलावर २०२० च्या सुरुवातीला झाला होता. तसेच या विषाणूमुळे जगभरात सुमारे ७० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत, असे सांगितले जाते. एवढेच नाही तर या साथीने मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम घडवून आणले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news