मांजरा कारखान्याकडून ऊस उत्पादकांना प्रति टन ३१७७.६२ रुपये अंतिम दर; २२७ कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

लातूर (प्रतिनिधी): सहकारी साखर कारखानदारीत देशात आणि राज्यात आपला नावलौकिक जपणार्‍या लातूर तालुक्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर गळीत हंगाम २०२५-२६ चे अंतिम ऊस बिल जमा केले आहे. या हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रति मेट्रिक टन ३१७७.६२ रुपये प्रमाणे अंतिम बिल देण्यात आले असून, यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी चालू हंगामासाठी किमान ३१५० रुपये प्रति मॅट्रिक टन दर जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात जाहीर दरापेक्षा जास्तीचा म्हणजेच ३१७७.६२ रुपये प्रति मॅट्रिक टन इतका दर देऊन मांजरा परिवाराने आपली उच्चांकी परंपरा कायम राखली आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर एकूण २२७ कोटी ३२ लाख ९७ हजार ९४६ इतकी मोठी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

कारखान्याने यापूर्वी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना २८५० रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे ऊसबील अदा केले होते. त्यानंतर आता उर्वरित ३२७.६२ रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे असणारी अंतिम रक्कम चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या आदेशाने १० जून २०२६ रोजी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यंदाचा गळीत हंगाम दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला असून, कारखाना व्यवस्थापनाने सर्व संबंधित शेतकऱ्यांना आपल्या बँक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news