बँकॉक : थायलंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दक्षिण थायलंडमध्ये मृतांचा आकडा १४५ वर पोहोचला आहे, पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अधिका-यांनी म्हटले की पुराचे पाणी कमी होत असताना, विनाशाचे भयानक दृश्य समोर येत आहे.
थायलंडच्या आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी सांगितले की, मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील १२ प्रांतांमध्ये पूर आला आहे, ज्यामुळे १२ लाखांहून अधिक कुटुंबं आणि ३६ लाख लोक प्रभावित झाले आहेत. बँकॉकमध्ये पत्रकार परिषदेत सरकारी प्रवक्ते सिरिपोंग अंगकासाकुल्कियात म्हणाले की, पुरामुळे आठ प्रांतांमध्ये १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सोंगखला प्रांताला सर्वाधिक फटका बसला आहे, ज्यामध्ये ११० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
पुराचे पाणी कमी होत असताना सोंगखला प्रांतातील मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दक्षिण थायलंडमधील सर्वात मोठे शहर असलेल्या हात याईमध्ये सर्वाधिक मृतदेह सापडले. आपत्ती विभागाने शुक्रवारी बहुतेक बाधित भागात पाणी कमी झाले आहे, परंतु काही भागात पाण्याची पातळी अजूनही जास्त आहे. हवामान विभागाने दक्षिणेकडील भागात पाऊस कमी झाला आहे, परंतु काही भागात वादळाचा इशारा दिला आहे.
पुरामुळे दक्षिण थायलंडमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, हजारो लोक अडकले आहेत, वाहतूक ठप्प झाली आहे आणि कमी उंचीच्या इमारती आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत. व्हीडीओ आणि फोटोंमध्ये कोसळलेले रस्ते, कोसळलेले विजेचे खांब, वस्तू आणि जोरदार प्रवाहाने वाहून असंख्य गोष्टी दिसत आहेत, गाड्या देखील वाहून गेल्या आहेत.

