६० फूट खोल दरीत कोसळूनही शेरपा ६ दिवसांनंतर जिवंत परतला

काठमांडू : मृत्यूलाही चकवा देणारी एक चमत्कारिक घटना जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्टवर घडली. एवरेस्टच्या उणे १८ अंश सेल्सिअस इतक्या गोठवणा-या तापमानात, अन्न, पाणी आणि ऑक्सिजनशिवाय तब्बल ६ दिवस बेपत्ता असलेले ५२ वर्षीय शेरपा गाईड दावा शेरपा जिवंत परतले आहेत. त्यांचा शोध न लागल्याने ज्या कुटुंबाने त्यांना मृत मानून पारंपरिक अंत्यसंस्काराची आणि धार्मिक विधींची तयारी सुरू केली होती. इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी आणि अनोखी सेल्फ रेस्क्यू घटना मानली जात आहे.

दावा शेरपा हे पोलंडच्या एका पर्वतारोहीसह एका ब्रिटिश गिर्यारोहकासोबत एवरेस्ट मोहिमेवर गेले होते. २८ मे रोजी मोहीम फत्ते करून परतत असताना, कॅम्प-३ आणि कॅम्प-४ दरम्यान ते अचानक बेपत्ता झाले. २९ मे रोजी २५,००० फूट उंचीवर असलेल्या यलो बँड जवळ त्यांना शेवटचे पाहण्यात आले होते. त्यांच्यासोबतचे इतर लोक सुरक्षित बेस कॅम्पवर परतले, पण दावा शेरपा मात्र पोहोचू शकले नाहीत.सुरुवातीच्या शोध मोहिमेत बचाव पथकाला त्यांचा कोणताही सुगावा लागला नाही. त्यातच एवरेस्ट चढाईचा हंगाम संपत आल्यामुळे अनेक गिर्यारोहक डोंगर सोडून गेले होते आणि मार्गावरील रस्ते, दोर, शिड्या व इतर उपकरणेही काढली जात होती. अनेक दिवस उलटल्याने अखेर सहकारी आणि कुटुंबीयांची आशा संपली. कुटुंबाने अत्यंत जड त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली होती.

बर्फानेच वाचवला जीव
सोमवारच्या रात्री कॅम्प-१ जवळ दावा शेरपा हे अचानक सुमारे ६० फूट खोल बर्फाच्या दरीत कोसळले होते. मात्र, निसर्गाचा चमत्कार असा की, त्याच रात्री झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे आणि एका छोट्या हिमस्खलनामुळे ती खोल दरी बर्फाने भरली गेली. त्यामुळे त्यांना वर येण्यासाठी आधार मिळाला आणि बुधवारी रात्री ते कसेबसे त्या दरीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. एवढ्या उंचीवर हवेचा दाब अत्यंत कमी असतो आणि ऑक्सिजनची प्रचंड कमतरता असते. अशा परिस्थितीत दावा शेरपा यांनी जगण्यासाठी अनोखा संघर्ष केला. वाटेत इतर पर्वतारोहकांनी सोडून दिलेल्या तंबूंमध्ये शिल्लक राहिलेले अन्न, पाणी आणि रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरमधील थोड्याफार ऑक्सिजनच्या मदतीने त्यांनी स्वत:ला जिवंत ठेवले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news