पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इटली दौरा नुकताच पार पडला. त्यावरून देशातील विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इटलीचा दौरा अनेक गोष्टी लपवण्यासाठी केल्याचे पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
आंबेडकर म्हणाले, मोदींचा जो दौरा आहे तो स्पॉक्सक्रीन आहे. त्यांचा ठरलेला दौरा हा वेगळा होता. गॅस आणि महागाईची समस्या ही मोदींंमुळे आहे. इस्रायल आणि पॅलिस्टिनमधील भांडणाचा परिणाम म्हणून इटलीत ४ जहाजे अडवली आहेत. ज्यामध्ये ८०० टन मिलिटरी ग्रेडेड स्टील आहे. त्याचा वापर पॅलिस्टिनला संपवण्यासाठी करणार आहे. त्यांना माहिती आहे की, भारत सरकार इस्रायलबरोबर आहे. संभाजीनगरची मित्तल स्टील नावाची कंपनी आहे, जी स्टीलच्या या गोष्टीत सहभागी आहे. इस्रायलला हे माहीत झाले की, भारत इस्रायलला मिलिटरी ग्रेनाईट पोचवत आहे. इटलीला हे कळल्यामुळे आपल्या देशात गॅस आणि इतर गोष्टींची टंचाई झाली.
भारताला चीन आणि इतर देश विरोध करत आहेत. त्याचे कारण नरेंद्र मोदींची प्रतिमा कारणीभूत आहे. मोदी अडचणीत आले आहेत. त्यामुळे भारताला जे करायचे नाही ते केले जात आहे. इटलीतील या कंपनीची कमिटी जेलमध्ये आहे. आपल्याकडे यासाठी काही विशेष रुल्स नाहीत. मोदींच्या इटली दौ-याचे कारण भारताने पाठवलेले स्टील लपवणे आहे. त्यामुळे जगात विरोध होत आहे. इंटरनॅशनल पातळीवर याची चर्चा आहे. आम्ही म्हणतो ते खरं आहे की खोटं हे मोदींनी सांगावं. लोकांना प्रश्नांची उत्तरे द्यावी. चार जहाजे इटली सरकारने पकडली आहेत, जी इस्रायलला चालली होती. या गोष्टी लपविण्यासाठी मोदी इटलीला गेले होते आणि ज्या कंपनीचे मालक जेलमध्ये आहेत.
ही गोष्ट आणि डॉक्युमेंट बाहेर यायला नको म्हणून त्यांनी हा दौरा केला. मेलडी चॉकलेट हे त्यांनी केलेले काम लपविण्यासाठी दिले आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, औरंगाबाद या कंपनीने स्टील पाठविले आहे. पंतप्रधान मोदींनी हा स्टंट केला आहे. फक्त इतर देशांची नावे पुढे करायची आणि इटलीला जायचे असे केले आहे. त्या जहाजांची माहिती बाहेर येऊ नये म्हणून हे केले आहे.
मोदींवर दबाव आहे
भारताला जे एलपीजी आणि क्रूड ऑईल यायला पाहिजे होते. युद्ध सुरू होते तेव्हा सगळं मिळालं आता का मिळत नाही? त्याचे कारण मोदी आहे. एपस्टिन फाईलमध्ये नाव आल्याने मोदींचे असे सगळे सुरू आहे. चोरून मिलिटरी ग्रेनाईट इस्रायलला का पोचवले जाते? भारताला क्रूड ऑईल द्यायला सगळे देश तयार आहेत. हे सगळं मोदींमुळे अडलं आहे. मोदींनी न्यूट्रल धोरण बदलून इस्रायलधार्जिणे धोरण आखले आहे. त्यामुळे हे सगळे झाले. देशाच्या हिताचे धोरण बदलले आहे. एपस्टीन रेकॉर्ड अमेरिकेकडे आहे, त्यामुळे मोदींवर दबाव आहे.
















